मुंबई, 07, जून: 26/11 ही तारीख आणि ती रात्र नुसती आठवली तरी प्रत्येक भारतीयाच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. कोण कुठले ते दहशतवादी समुद्र मार्गे पाकिस्तानातून येतात आणि थेट मुंबईत येऊन धडकतात. पाहताक्षणी मृत्यूचा तांडव सुरु होतो. ताज हॉटेल काय, ओबेरॉय हॉटेल काय CST स्टेशन काय हळूहळू गोळीबाराच्या आवाजानं संपूर्ण मुंबई कापून उठते. आपले नापाक मनसुबे घेऊन आलेले हे दहशतवादी बायका, पोरं, वृद्ध असा कसलाच विचार ना करता रक्ताचा अक्षरशः सडा पाडत असतात. पण अशा वेळी मुंबई पोलिसांच्या तीन अधिकाऱ्यांना आपला जीव गमवावा लागतो. या घटना सुरु असतानाच दहशतवादी ताज हॉटेलमध्ये घुसतात. तिथल्या लोकांना ओलीस ठेवतात. सगळीकडे भीतीचं वातावरण असताना आपला जीव आता वाचवणार कोण हा विचार तिथल्या प्रत्येकाच्या मनात असतो. अशा वेळी अनेक बहादूर पोलीस ऑफिसर्स SG कमांडो धुरा सांभाळतात. पण त्यात एक SAG कमांडोंचा मेजर असतो ज्यांचं नाव असतं मेजर संदीप उन्नीकृष्णन. शत्रूच्या छावणीत घुसून त्यांना अस्मान दाखवणाऱ्या ऑफिसर्सपैकी संदीप एक. त्यांचं कार्य बघूया. कोणते होते मेजर संदीप उन्नीकृष्णन संदीप उन्नीकृष्णन हे बंगळुरूमध्ये राहणाऱ्या मल्याळी कुटुंबातून आले आहेत. केरळमधील कोझिकोड जिल्ह्यातील चेरुवन्नूर येथून त्यांचे कुटुंब बेंगळुरू येथे स्थलांतरित झाले. त्यांचे वडील के. उन्नीकृष्णन हे इस्रोचे अधिकारी राहिले आहेत. त्यांच्या आईचे नाव धनलक्ष्मी उन्नीकृष्णन आहे. तो त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. बंगळुरूमधील फ्रँक अँथनी पब्लिक स्कूलमधून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. विज्ञान शाखेतून 1995 मध्ये आय.एस.सी. केलं होतं. Army Success Story: … अन् सीमेवर दिसू लागली अदृश्य सावली; सैन्याचा ‘तो’ वीर जवान जो मृत्यूनंतरही करतोय देशाचं रक्षण 1995 मध्ये त्यांनी एनडीएमध्ये प्रवेश केला. चार वर्षांनंतर, प्रत्येक सैनिकाला जे स्वप्न असतं ते करण्याची संधी त्यांना मिळाली, म्हणजेच 1999 मध्ये त्यांना कारगिल युद्धात लढण्याची संधी मिळाली. त्यानंतर 2007 मध्ये त्यांचा राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) च्या स्पेशल अॅक्शन ग्रुपमध्ये (SAG) समावेश करण्यात आला. 26/11 ची ती रात्र…… मुंबई हल्ल्यातील ओलिसांची सुटका करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या एसएजी टीमचं नेतृत्व मेजर संदीप यांच्याकडे होतं. संदीप आपल्या 10 कमांडोसह हॉटेलच्या इमारतीत घुसले. पण काम कठीण होतं वरून दहशतवादी सतत गोळीबार करत होते. दहशतवाद्यांना माघार घेण्यासाठी त्यांची टीम प्रत्युत्तर देत होती. यादरम्यान दहशतवाद्यांची गोळी त्यांच्या एका साथीदार सुनील यादव याला लागली. संदीप यांनी त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली आणि त्यांना बाहेर पाठवलं. UPSC Exam Tips: IAS, IPS व्हायचंय ना? मग UPSC परीक्षेत ‘या’ चुका कधीच करू नका; हातचा जाईल जॉब पण यादरम्यान संदीप यांना काही गोळ्याही लागल्या. पण सोडतो तो भारतीय जवान नाही. स्वतःला गोळ्या लागल्या असूनही त्यांनी तब्बल 14 ओलिसांची यशस्वी सुटका केली. कमांडोंच्या यशस्वी प्रत्युत्तरानंतर दहशतवादी जीव वाचवून पळू लागले. पण या पळपुट्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी मेजर संदीप वर चढले आणि म्हणाले “वर येऊ नका. मी त्यांना सामोरा जाईन. मेजर संदीप यांनी काही दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. मात्र मागून लपलेल्या एका दहशतवाद्याने संदीप यांच्यावर हल्ला केला. गंभीर जखमी झाल्यानंतरही ते दहशतवाद्यांशी लढत राहिले. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी दहशतवाद्यांशी जोरदार मुकाबला केला. पण हा वीर योद्धा शहीद झाला. देशाच्या आणि देशातील लोकांच्या संरक्षणासाठी जीव ओवाळून टाकणारा भारतीय जवान होणे नाही. महाराष्ट्रात मेगाभरतीची घोषणा! ‘या’ पदांसाठीच्या तब्ब्ल 2,384 जागांवर मिळणार सरकारी नोकरी; तुम्ही आहात का पात्र? मेजर संदीप यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बंगळुरू येथील त्यांच्या घराबाहेर लोकांची मोठी गर्दी झाली होती. ‘संदीप उन्नीकृष्णन अमर रहे’च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेलं होतं. पूर्ण लष्करी सन्मानाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या शौर्यासाठी, त्यांना मरणोत्तर अशोक चक्र, शांतताकालीन सर्वोच्च शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.