नवी दिल्ली, 27 जुलै: अर्थ मंत्रालयाच्या (Finance Ministry of India) वित्तीय सेवा विभागात (Ministry of Finance Recruitment 2021) लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिष्ठाता आणि अध्यक्ष या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवरांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 24 आणि 26 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदांसाठी अर्ज अधिष्ठाता (Founder) अध्यक्ष (President) शैक्षणिक पात्रता या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच जाहिरातीत दिल्याप्रमाणे उमेदवारांमध्ये पात्रताअसणं आवश्यक आहे. हे वाचा - कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचंय? मग लगेच शिकून घ्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्ट अर्ज पाठवण्याचा पत्ता अवर सेक्रेटरी (डीआरटी), वित्तीय सेवा विभाग, अर्थ मंत्रालय, तिसरा मजला, जीवनदीप इमारत, संसद मार्ग, नवीन दिल्ली – 110001 अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 24 आणि 26 ऑगस्ट 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.