जालना, 30 जून : राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी काही दिवसांपूर्वी राज्यात लवकरच प्राध्यापकांच्या जागांसाठी मोठी भरती (Professors Recruitment Maharashtra) होणार अशी घोषणा केली होती. त्यामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले प्राध्यापक सुखावले आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता या भरतीची कार्यालयीन प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे आणि लवकरच या संबंधीची जाहिरातही प्रसिद्ध केली जाईल अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत दिली आहे. ते सध्या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
हे वाचा -विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवल्यास होणार कठोर कारवाई: वर्षा गायकवाड
जे प्राध्यापक तासिकातत्वावर (Hourly basis) आहेत त्यांच्यासाठीही काहीशी दिलासादायक माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचा तास आता 60 मिनीटाऐवजी 48 मिनिटांचा करण्यात आला आहे. तर युजीसाठीचं (UG) मानधन 500 वरून 625 तर पीजी (PG) आणि लॉसाठी (Law) 600 वरून 750 रुपये इतकं वाढवण्यात आलं आहे.
याबरोबरच विद्यपीठाच्या 629 पदांची आणि ग्रंथपालांची (Librarian) 121 पदांची देखील भरती होणार असल्याचं ते म्हणाले. दरम्यान संवर्ग बदली करून भरती करायचं असेल तर त्यात किमान दीड वर्ष जाईल त्यामुळे सदर प्राध्यापक भरती ही पारंपरिक पद्धतीनेच केली जाणार असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. मात्र, आदिवासी मंत्रालय, ओबीसी मंत्रालय, सामाजिक न्याय मंत्रालय यांनी तसा प्रस्ताव पाठवल्यास पुढच्यावेळी संवर्ग बदली करून भरती करू असंही उदय सामंत म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Jobs, Maharashtra News