प्रवीण सिंग, प्रतिनिधी आगरा, 29 मे : केंद्रीय लोकसेवा आयोग 2022 परिक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक तरुणांच्या संघर्षाच्या कथा समोर येत आहेत. UPSC परीक्षा उत्तीर्ण झालेले अनेक लोक आहेत ज्यांनी सर्व अडचणींमध्येही नागरी सेवांसाठी तयारी केली आणि वारंवार अपयशाला न घाबरता आपली मेहनत चालू ठेवली. पण अखेर त्यांचा संघर्ष रंगला आणि हे सर्व तरुण-तरुणी आता अधिकारीपदी विराजमान होणार आहेत. यापैकी एक आग्रा येथील सुषमा सागर ही तरुणी. आज जाणून घेऊया, त्यांचा यशस्वी प्रवास.
सुषमा यांनी 2018मध्ये देखील UPPSC क्रॅक केली होती. त्यानंतर त्या राज्य कर विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. सुषमा सागर यांचे वडील न्याय विभागात शिपाई म्हणून तैनात आहेत. मुलीच्या यशानंतर वडिलांच्या आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सुषमाचे कुटुंब आग्रा येथील बुधी ओम नगर येथील रहिवासी आहे. त्यांनी दयालबाग येथील प्रेम विद्यालयातून हायस्कूल आणि इंटरमिजिएट उत्तीर्ण केले आहे. तर दयालबाग विद्यापीठातून बी.एस्सी. मध्ये त्या युनिव्हर्सिटी टॉपर राहिल्या आहेत.2018 मध्ये, सुषमा सागर उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाची PCS परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन अधिकारी बनल्या. त्या सध्या गाझियाबादमध्ये तैनात आहेत. सुषमा सागर सांगते की त्यांनी 2019 मध्ये UPSC प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण केल्या होत्या. पण ती मुलाखतीत पास नाही झाल्या. पण त्यांनी नोकरीबरोबरच तयारी सुरू ठेवली. नोकरीबरोबरच अभ्यासासाठी तीन ते चार तास त्या सलग अभ्यास करायच्या. यावेळी सुषमाला UPSC 2022 मध्ये 733 वा क्रमांक मिळाला आहे. त्यांचा हा प्रवास आजच्या तरुणाईसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.

)







