नवी दिल्ली, 16 सप्टेंबर: भारतात उच्च शिक्षण (Higher education in India) घेणाऱ्या विद्यार्थ्याना चांगल्या पद्धतीचं आणि उत्तम शिक्षण मिळावं यासाठी AICTE आणि MIcrosoft कंपनीनं (Microsoft Company) पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. मायक्रोसॉफ्टनं उदयोन्मुख क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांना गियर करण्यासाठी फ्युचर रेडी टॅलेंट इंटर्नशिप प्रोग्राममध्ये (Future Ready Talent Internship Program) AICTE ला सहकार्य केलं आहे. यामाध्यमातुन दीड लाख विद्यार्थ्यांना इंटर्नशिप्स देण्यात येणार आहेत आणि ऑनलाईन कोर्सेसही (Online Courses) ऑफर केले जाणार आहेत.
इंटर्नशिप अभ्यासक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 (National Education policy 2020) शी जुळला आहे. याअंतर्गत मायक्रोसॉफ्ट क्लाउड कॉम्प्युटिंग, डेटा सायन्स, AIआणि सायबर सिक्युरिटी (Cyber Security) सारख्या विषयांवर लर्निंग मॉड्यूल आणि सर्टिफिकेशन्स, कौशल्यपूर्ण विद्यार्थ्यांना देणार आहे. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना केवळ डेटा आणि AI, क्लाउड कॉम्प्युटिंग आणि सायबर सिक्युरिटी सारख्या संबंधित तंत्रज्ञानामध्ये कौशल्य देणार नाही तर त्यांना सँडबॉक्स वातावरणात महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट्सवर काम करण्याची संधी विद्यार्थ्यांना देणार आहे.
हे वाचा - नो टेन्शन! आता आर्ट्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनाही IITमध्ये मिळणार प्रवेश
हा भारतातील सर्व उच्च शिक्षणाच्या विद्यार्थ्यांसाठी खुला केलेला पहिला आभासी इंटर्नशिप कार्यक्रम असेल ज्या अंतर्गत फ्युचर रेडी टॅलेंटच्या माध्यमातून 1.5 लाख विद्यार्थ्यांना स्किलफुल बनवलं जाईल. यामधील पहिल्या बॅचमध्ये 50,000 रजिस्ट्रेशन्स केले जाणार आहेत.
इंटर्नशिप त्यांच्या दुसऱ्या वर्षात किंवा त्यापेक्षा टेक्निकल किंवा नॉन-टेक्निकल पार्श्वभूमीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप असणार आहे. ही विनामूल्य असणार आहे. यासाठी पात्र विद्यार्थी इंटर्नशिप कार्यक्रमासाठी फ्युचर रेडी टॅलेंट वेबसाइटला भेट देऊन आणि खुल्या बॅचसाठी नोंदणी शकणार आहेत. पहिल्या बॅचसाठी नोंदणी 15 सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Microsoft