मराठी बातम्या /बातम्या /करिअर /याला वेडेपणा म्हणावा की तुफानी! बोर होतं म्हणून पठ्ठ्यानं सोडली Netflix मधील 3.5 कोटी पॅकेजची नोकरी

याला वेडेपणा म्हणावा की तुफानी! बोर होतं म्हणून पठ्ठ्यानं सोडली Netflix मधील 3.5 कोटी पॅकेजची नोकरी

मायकेल लिन (Michael Lin)

मायकेल लिन (Michael Lin)

Netflix मध्ये काम करून बोर होत होतं म्हणून या पठ्ठ्यानं तब्बल सडे तीन कोटींच्या वार्षिक पॅकेजची नोकरी सहज सोडून दिली. आता तुम्ही याला येडेपणा म्हणा की तुफानी पण ही गोष्टी खरी आहे.

मुंबई, 06 जून: या जगात कोण कधी आणि कसं वागेल काहीही सांगता येत नाही. जगभरात तरुण चांगल्या पॅकेजची नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असतात. नाही काहीतर भारतात युवावर्ग सरकारी नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असतो. मात्र काही लोक असेही असतात जे अगदी क्षुल्लक कारणासाठी नोकरी सोडतात. अशा काही लोकांमध्ये आहे मायकेल लिन (Michael Lin) नावाचा व्यक्ती.

या पठ्ठ्यानं netflix ची नोकरी सोडली म्हणे. आता तुम्ही म्हणाल त्याला दुसरी नोकरी मिळाली असेल किंवा मतभेदांमुळे त्यानं नोकरी सोडली असेल. पान असं अजिबात नाही. Netflix मध्ये काम करून बोर होत होतं म्हणून या पठ्ठ्यानं तब्बल सडे तीन कोटींच्या वार्षिक पॅकेजची नोकरी सहज सोडून दिली. आता तुम्ही याला येडेपणा म्हणा की तुफानी पण ही गोष्टी खरी आहे. त्यानं स्वतः त्यांच्या Linked In अकाउंटवर यासंबंधी पोस्ट लिहिली आहे.

अॅमेझॉनमधील नोकरी सोडल्यानंतर मायकेल लिन 2017 मध्ये नेटफ्लिक्समध्ये वरिष्ठ सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून रुजू झाला त्यावेळी आता आपण कायमचे इथेच नोकरी करू असं वाटलं होतं पण काही दिवसातच तो या जॉबला बोर झाला.

कोरोना म्हणतोय 'पुन्हा येईन'; त्यात शाळा होताहेत सुरु; कोरोनाचे 'हे ' नियम पाळाच

"मी वर्षभरात $450,000 (सुमारे 3.5 कोटी रुपये) कमावले, दररोज मोफत जेवण मिळाले आणि अमर्यादित सशुल्क वेळ मिळाला.हे सर्व मिळावं हे माझा आधीपासूनच स्वप्नं होतं . मात्र काही काळानंतर मी बोर झालो आणि मी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला." असं लिनने आपल्या Linked In पोस्टमध्ये म्हंटलं आहे.

"माझ्या पालकांनी सर्वप्रथम आक्षेप घेतला. त्यांच्यासाठी, मी सोडल्यामुळे अमेरिकेत स्थलांतरित होण्याची त्यांची मेहनत वाया जात होती," लिन म्हणाले. "माझे गुरू आक्षेप घेणारे दुसरे होते. त्यांनी सांगितले की मी दुसरी नोकरी शोधल्या शिवाय सोडू नये कारण पुढच्या नोकरीवर माझ्या पगाराची वाटाघाटी करताना मी माझ्या उच्च पगाराचा फायदा घेऊ शकेन. यामुळे मला विचार करण्यास भाग पाडले गेले. म्हणूनच मी माझ्या मॅनेजरला राजीनामा देण्याआधी तीन दिवस वाट बघितली" असंही लिनने सांगितलं.

...म्हणून घेतला हा निर्णय

"सुरुवातीच्या काळात त्याने नोकरीवर बरेच काही शिकले. "Netflix वर काम करणे म्हणजे तुम्ही MBA प्रोग्राम्समध्ये शिकत असलेल्या केस स्टडीजवर काम करण्यासाठी मोबदला मिळण्यासारखे होते, मी दररोज बरेच काही शिकलो, पण काही वर्षांत चमक कमी होऊ लागली आणि कोविडचा प्रादुर्भाव झाल्यानंतर, नोकरीबद्दल आवडलेल्या जवळजवळ सर्व गोष्टी निरस वाटू लागल्या फक्त काम उरले होते, आणि मला आता कामाचा आनंद मिळत नव्हता, म्हणूनच मी ही नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला" असं लिनने सांगितलं.

Interview आधी Resume च ठरवतो भविष्य; असा बनवाल तर जॉब्सची येईल लाट

आता पुढे काय?

"मी Netflix मधील माझी नोकरी सोडल्यापासून आठ महिने झाले आहेत आणि मी स्वतःसाठी काम करण्याचे पूर्णपणे वचनबद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे," लिन म्हणाले. "मी नुकतीच सुरुवात करत असलो आणि माझ्याकडे उत्पन्नाचा कोणताही विश्वासार्ह प्रवाह नसला तरी, मी या प्रक्रियेवर विश्वास ठेवणार आहे की जर मी मला ऊर्जा देणारे काम केले तर चांगल्या गोष्टी घडतील."

First published:
top videos

    Tags: Career, Job, Job alert, Netflix, World news