• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • MHT CET 2021 : PCM ग्रुपसाठीचं Admit Card आलं; असं करा डाउनलोड

MHT CET 2021 : PCM ग्रुपसाठीचं Admit Card आलं; असं करा डाउनलोड

महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेलने PCM इंजिनीअरिंग प्रोग्राम्ससाठी अॅडमिट कार्ड उपलब्ध केली आहेत. cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाइटवर ही अॅडमिट कार्डस् उपलब्ध करण्यात आली आहेत

  • Share this:
मुंबई 15 सप्टेंबर : महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेलने PCM इंजिनीअरिंग प्रोग्राम्ससाठी अॅडमिट कार्ड उपलब्ध केली आहेत. cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाइटवर ही अॅडमिट कार्डस् (MHT CET 2021 Admit Card) MHT CET 2021उपलब्ध करण्यात आली आहेत. नोंदणी केलेले उमेदवार BE/BTech प्रोग्राम्ससाठीची MHT CET अॅडमिट कार्डस् या अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड (Download PCM Group Admit Card) करून घेऊ शकतात. त्यासाठी त्यांना अॅप्लिकेशन नंबर, जन्मतारीख आणि अन्य लॉगिन क्रेडेन्शियल्सचा वापर करून या वेबसाइटवर लॉगिन करावं लागणार आहे. 21 सप्टेंबर ते एक ऑक्टोबर या कालावधीत ही परीक्षा होणार आहे. MHT CET हॉल तिकिटावर परीक्षेची तारीख आणि वेळ, परीक्षेचं ठिकाण, उमेदवाराची वैयक्तिक माहिती, महत्त्वाच्या सूचना आणि मार्गदर्शक सूचना आदी माहिती दिलेली असेल. MHT CET hall ticket 2021 कसं पाहायचं किंवा डाउनलोड करायचं, याबद्दलची माहिती येथे देत आहोत. Gold Price Today: सोने-चांदीच्या दरात घसरण; तपासा लेटेस्ट गोल्ड रेट पहिला टप्पा - cetcell.mahacet.org ही MHT CET Cell ची अधिकृत वेबसाइट आहे. केवळ त्याच वेबसाइटवर अॅडमिट कार्डस् उपलब्ध आहेत. त्या वेबसाइटला भेट द्यावी. दुसरा टप्पा - वेबसाइटचं होमपेज उघडल्यानंतर PCM Group साठीच्या MHT CET अॅडमिट कार्ड लिंकवर क्लिक करावं. तिसरा टप्पा - त्यानंतर आपला रजिस्ट्रेशन नंबर किंवा अॅप्लिकेशन नंबर, जन्मतारीख आणि पासवर्ड टाकावा. चौथा टप्पा - ही सगळी योग्य माहिती भरल्यानंतर PCM Group साठीचं MHT CET परीक्षेचं अॅडमिट कार्ड वेबसाइटवर दिसू लागेल. पाचवा टप्पा - स्क्रीनवर दिसत असलेलं हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यावं आणि त्याची प्रिंटआउट काढून घ्यावी. JEE Main Result 2021: 18 विद्यार्थ्यांना रँक 1, महाराष्ट्राचा अर्थवही अव्वल हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर प्रत्येक उमेदवाराने ते हॉल तिकीट बारकाईने वाचावं. त्यावर दिलेलं आपलं नाव, जन्मतारीख, फोटो आदी माहिती योग्य आहे ना, याची खात्री करून घ्यावी. त्यात काही चूक असल्यास उमेदवारांनी तातडीने त्याची माहिती MHT CET Cell ला दिली पाहिजे. MHT CET परीक्षा BE आणि BTech कोर्सेसना अॅडमिशन घेण्यासाठी आयोजित केली जाते. ही परीक्षा दोन ग्रुप्ससाठी असते. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हा पीसीबी ग्रुप आणि फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स हा पीसीएम ग्रुप. या परीक्षेत प्रत्येकी 100 मार्क्सचे तीन पेपर्स असतात. महाराष्ट्र बोर्डाच्या 11वी आणि 12वीच्या फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी या विषयांच्या सिलॅबसवर आधारित प्रश्न या पेपर्समध्ये विचारले जातात. प्रश्नांमध्ये 11वीच्या सिलॅबसला 20 टक्के वेटेज असतं, तर 12वीच्या सिलॅबसवर आधारित प्रश्न 80 टक्के असतात. एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकलं तर त्यासाठी निगेटिव्ह मार्किंग अर्थात मार्क कमी करण्याची पद्धत या परीक्षेत अवलंबली जात नाही.
First published: