मुंबई, 20 फेब्रुवारी: महाराष्ट्र स्टेट बोर्डाची बारावीची परीक्षा ही 21 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे आणि 21 मार्चपर्यंत असणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे हॉल तिकिट्स संबंधित शाळांकडून किंवा जुनिअर कॉलेजेसकडून मिळाले आहेत. हॉल तिकिटावरील संपूर्ण माहिती बरोबर आहे का हे विद्यार्थ्यांनी चेक करून घेणं आवश्यक आहे. तसंच यंदा तब्बल 14 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. त्यामुळे या परीक्षेची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्डाची बारावीची परीक्षा ही उद्यापासून सुरु होणार आहे. यंदा शिक्षणही ऑफलाईन झाल्यामुळे परीक्षाही ऑफलाईन पद्धतीनंच होणार आहेत. यंदा संपूर्ण राज्यभरातून तब्बल 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. आतापर्यंतची ही सर्वाधिक संख्या आहे असं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. कोरोनामुळे दहावीत विद्यार्थ्यांना मेरिट बेसिसवर पास करण्यात आलं होतं त्यामुळे पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास शंभर टक्के होती. त्यामुळे ही संख्या वाढली आहे. MH State Board 12th Exam: उद्यापासून स्टेट बोर्डाची 12वीची परीक्षा; टॉप येण्यासाठी IMP टिप्स वाचाच यंदा संपूर्ण राज्यभरातील 3195 मुख्य केंद्रावर ही परीक्षा पार पडणार आहे. तसंच बारावीच्या परीक्षेत मुलींची संख्या 6,6,461 इतकी असणार आहे तर मुलांची संख्या 7 लाखांवर असणार आहे. कॉपी मुक्त परीक्षा अभियान महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या परीक्षेत यंदा कॉपी मुक्त अभियान राबवण्यात येणार आहे. यामध्ये विशेष उपाय योजना करण्यात येणार आहेत. कॉपी रोखण्यासाठी केंद्रांवर विशेष भरारी पथकं आणि बैठी पथकं असणार आहेत. तसंच विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये यासाठी इतर प्रयत्न करण्यात येणार आहेत. MH State Board Exams: कसलं टेन्शन? एका क्षणात छूमंतर होईल परीक्षेचा ताण; या टिप्स ठरतील लाईफ चेंजिंग पेपरफुटी टाळण्यासाठी प्रयत्न पेपरफुटी टाळण्यासाठी प्रत्येक केंद्रावर 50 मीटर अंतरावर कुठल्या ही व्यक्तीला विद्यार्थी व्यतिरिक्त कोणालाही फिरायला परवानगी नसणार आहे. तसंच प्रत्येकपरीक्षा केंद्रापासून 50 मीटर अंतरावर झेरॉक्सचे दुकान बंद असणार आहे. विद्यार्थ्यांना पेपर लिहिताना शेवटी 10 मिनिटं वाढवून देण्यात येणार आहे. मात्र दहा मिनिटांआधी पेपर यंदा मिळणार नाहीये. Latur Pattern: फिजिक्समध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवण्याचा फॉर्म्युला काय? पाहा Video उच्च शिक्षण विभाग शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा संप असला तरी सुद्धा बारावीचे प्रॅक्टिकल पार पडले आहे..कुठले ही कॉलेज राहिले असतील तर थेअरीनंतर प्रॅक्टिकल देता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.