मुंबई, 09 जून: महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा बारावी परीक्षेचा निकाल
(Maharashtra State Board 12th Result 2022) काल दुपारी जाहीर झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकाल तब्बल नव्वद टक्क्यांच्या वर लागला. निकालात मुलींनी बाजी मारली तर सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा लागला. हजारो विद्यार्थ्यांना नव्वद टक्क्यांच्यावर घेऊन मिळाले. मात्र आता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मनात धाकधूक सुरु झाली आहे. बारावीचा निकाल तर लागला तर पण आता दहावीचा निकालही
(Maharashtra State Board 10th Result 2022) याच महिन्यात लागणार अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
दरवर्षी महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावी आणि बारावीच्या बोर्डाचा निकाल हा जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात
(Maharashtra State Board 12th Result 2022 date) जाहीर होतो. त्याप्रमाणे बारावीचा निकाल हा काल जाहीर करण्यात आला. मात्र यानंतर आता दहावीचा निकाल लवकरच लागणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल हा येत्या 15 जूनपर्यंत जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
MH Board 10th Result: विद्यार्थ्यांनो 'या' वेबसाईट्सवर बघता येईल 10वीचा निकाल; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
शिक्षण ऑनलाईन आणि परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. मात्र तरीही ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्या. त्यामुळे आता निकाल कसा लागणार आणि किती मार्क्स मिळणार यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात भीती आहे. मात्र निकालाचं कुतूहलही आहे.
लवकरच अपलोडींगचं काम होईल सुरु
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. शिक्षक सध्या त्यांच्या प्रतींचे मूल्यांकन करत आहेत. लवकरच निकाल अपलोड करण्याचे कामही केले जाणार असल्याचे मानले जात आहे. महाराष्ट्र बोर्ड निकालाची प्रत तपासल्यानंतर गुण नियंत्रित करते. त्यानंतर निकाल ऑनलाइन अपलोड केला जाईल.
'या' वेबसाईट्सवर बघता येईल निकाल
1. mahresult.nic.in
2. maharashtraeducation.com
3. mahahsscboard.maharashtra.gov.in.
4. sscresult.mkcl.org
Career Tips: विद्यार्थ्यांनो, 11वीपासूनच सुरु करा 'या' IMP प्रवेश परीक्षांची तयारी; सुसाट वेगानं पुढे जाईल करिअर
असा चेक करा निकाल
इयत्ता 10वीचा महाराष्ट्र SSC निकाल तपासण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी सुरुवातीला www.mahresult.nic.in या महाराष्ट्र बोर्डाच्या निकाल पोर्टलच्या अधिकृत वेबपेजला भेट द्या.
SSC परीक्षेसाठी MSBSHSE निकालासाठी अधिकृत वेबसाइट उघडल्यानंतर SSC परीक्षेचा निकाल हा पर्याय येईल ज्यावर विद्यार्थ्यांना पुढील वेब पेजवर भेट देण्यासाठी क्लिक करा.
Career Tips: विद्यार्थ्यांनो, 11वीपासूनच सुरु करा 'या' IMP प्रवेश परीक्षांची तयारी; सुसाट वेगानं पुढे जाईल करिअर
यानंतर आईचे नाव आणि रोल नंबर ही महत्त्वाची क्रेडेन्शियल्स टाकण्यास विसरू नका. विद्यार्थ्यांना दोन्ही आवश्यक क्रेडेन्शियल्स भरावे लागतील आणि नंतर View Result पर्यायावर क्लिक करा. तुमचा निकाल तुमच्या समोर असेल. पुढील रेफरन्ससाठी निकाल डाउनलोड किंवा सेव्ह करून ठेवा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.