जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / खूशखबर! Infosys नंतर आता 'ही' मोठी IT कंपनी 50,000 फ्रेशर्सना देणार नोकरी; अनेकांना मिळणार संधी

खूशखबर! Infosys नंतर आता 'ही' मोठी IT कंपनी 50,000 फ्रेशर्सना देणार नोकरी; अनेकांना मिळणार संधी

खूशखबर! Infosys नंतर आता 'ही' मोठी IT कंपनी 50,000 फ्रेशर्सना देणार नोकरी; अनेकांना मिळणार संधी

मागे न राहता आणखी एका मोठ्या IT कंपनीनं या वर्षी सर्वात मोठी पदभरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 फेब्रुवारी: काही IT कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर जॉब्सच्या संधी (Career in IT companies in India) देण्यास सुरुवात केली आहे. TCS, Infosys सारख्या कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांची भरती (Mega recruitment for freshers in IT sector) करण्याची घोषणा केली आहे. त्यात आता फ्रेशर्ससाठी ही IT क्षेत्रात नोकऱ्यांचा पाऊस पडणार आहे. यात मागे न राहता आणखी एका मोठ्या IT कंपनीनं या वर्षी सर्वात मोठी पदभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. नामांकित IT कंपनी Cognizant नं येत्या आर्थिक वर्षात देशभरात तब्बल 50,000 फ्रेशर्सना नोकरी (Cognizant to hire 50k freshers) देण्याचा निर्णय घेतला आहे. या आदीही या कंपनीनं मोठ्या पदभरतीची घोषणा (Cognizant hiring 50 thousand freshers) केली होती. त्यानुसार या वर्षीच्या शेवटपर्यंत कंपनी 50,000 फ्रेशर्सना रोजगार देणार आहे. उमेदवारांनो, फक्त 2 दिवस शिल्लक; बँक ऑफ महाराष्ट्रमधील 500 पदांसाठी इथे करा अर्ज याआधी या कंपनीने 33,000 हून अधिक नवीन लोकांची भरती केली होती, जी 2020 मध्ये केलेल्या 17,000 कर्मचाऱ्यांची भरती केलेल्या संख्येपेक्षा दुप्पट आहे. कॉग्निझंटकडे वर्षाच्या अखेरीस 330,600 कर्मचारी होते, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 14 टक्क्यांनी वाढले आहेत. TCS, Infosys आणि Wipro या स्पर्धकांच्या तुलनेत अ‍ॅट्रिशन रेट जास्त असला तरी,मागील काही महिन्यांमध्ये आणि वर्षांमध्ये कंपनीनं हा रेट बराच खाली आणला आहे. कर्मचारी सोडून जाण्याची संख्या कॉग्निझंटमध्ये कमी करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 21 च्या 3 तिमाहीमध्ये कॉग्निझंट मधील अॅट्रिशन रेट 33 टक्के होता येणाऱ्या काळात निर्माण होणार लाखो नोकऱ्या विविध कारणांमुळे अलीकडच्या काही दिवसांत आयटी फर्मचा अट्रिशन रेट (Attrition Rate in IT companies) थोडा जास्त आहे. कंपनीचा अ‍ॅट्रिशन रेट म्हणजेच कर्मचाऱ्यांनी नोकरीवरून राजीनामा देऊन निघून जाणे. हा अॅट्रिशन रेट कंपनीच्या टर्नओव्हर रेटवर परिणाम करेल. म्हणूनच, अनेक कंपन्या अॅट्रिशन रेट कमी करण्याचा विचार करत आहेत. क्या बात है! आता पहिल्याच प्रयत्नात Crack होईल Bank PO परीक्षा; असा करा अभ्यास म्हणूनच Infosys कंपनीनं येणाऱ्या आर्थिक वर्षात तब्बल 55,000 फ्रेशर्सना (Infosys recruitment for 55,000) जॉब देणायचा निर्णय घेतला आहे. तर Cognizant नं येत्या आर्थिक वर्षात देशभरात तब्बल 50,000 फ्रेशर्सना नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे आता TCS, Wipro आणि इतर कंपन्यांनीही येणाऱ्या आर्थिक वर्षात अनेक फ्रेशर्स आणि प्रोफेशनल्सना जॉब देण्याचा निर्णय घेतला आहे. .म्हणूनच येत्या वर्षात अनेक फ्रेशर्स आणि प्रोफेशनल्सना जॉब मिळणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात