मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

क्या बात है! आता पहिल्याच प्रयत्नात Crack होईल Bank PO परीक्षा; अशा पद्धतीनं करा Smart Study

क्या बात है! आता पहिल्याच प्रयत्नात Crack होईल Bank PO परीक्षा; अशा पद्धतीनं करा Smart Study

5. स्टडी रूममध्ये अभ्यास करताना हे ध्यानात ठेवावे की, तुमचा चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा.

5. स्टडी रूममध्ये अभ्यास करताना हे ध्यानात ठेवावे की, तुमचा चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा.

आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स (Tips to crack Bank PO Exam) देणार आहोत ज्यामुळे तुम्ही बँक PO ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात crack करू शकाल. चला तर मग जाणून घेऊया.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 17 फेब्रुवारी: सरकारी नोकरीचे (Government Jobs) अनेक फायदे आहेत. त्याच फायद्यांचा फायदा घेण्यासाठी बहुतेक तरुण निश्चितपणे सरकारी नोकऱ्यांची तयारी (How to prepare for Government Jobs) करतात. यामध्ये UPSC परीक्षा आणि बँक परीक्षा (Bank exams) यांचाही प्रामुख्याने समावेश आहे. भारतातील तरुण मोठ्या संख्येने बँक जॉबसाठी परीक्षेची तयारी (Bank jobs Preparation) करतात. बँकेत PO म्हणजेच प्रोबेशनरी ऑफिसर (How to crack bank PO exam in singe attempt) एक अशी पोस्ट आहे ज्यासाठी देशभरातील लाखो विद्यार्थी परीक्षा देतात. मात्र अनेकांना यामध्ये निराशा हाती येते. मात्र आता चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स (Tips to crack Bank PO Exam) देणार आहोत ज्यामुळे तुम्ही बँक PO ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात crack करू शकाल. चला तर मग जाणून घेऊया.

बँक पीओ परीक्षेचा अभ्यासक्रम समजून घेणं आवश्यक

IBPS (Bank Exam Syllabus) च्या कोणत्याही परीक्षेसाठी कोणताही निश्चित अभ्यासक्रम नाही. परंतु मागील वर्षांच्या बँक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका पाहून प्रमुख विषयांची कल्पना येऊ शकते. त्यांचे अभ्यास साहित्य ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे.

MBA की MCA? ग्रॅज्युएशननंतर नक्की कोणत्या क्षेत्रात करावं PG; जाणून घ्या माहिती

मॉक टेस्ट खूप महत्वाची

बँक परीक्षांच्या तयारीसाठी जास्तीत जास्त मॉक टेस्ट देण्याचा प्रयत्न करा. बँक परीक्षांमध्ये कमी वेळात जास्त प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. मॉक टेस्ट बँक पीओ परीक्षेसाठी स्वत:ला तयार करण्यात मदत करतात. यामुळे तुम्हाला एकंदर परिकसेहची माहिती मिळू शकते.

चालू घडामोडींची माहिती ठेवा

बँक पीओ परीक्षेत बसलेल्या उमेदवारांनी दररोज वर्तमानपत्र वाचणे आवश्यक आहे. परीक्षेच्या तयारीचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. हे तुमचे सामान्य ज्ञान देखील मजबूत करेल. म्हणून करंट अफेयर्स वर लक्ष केंद्रित करा आणि अभ्यास करत राहा.

लॉजिकल राईझींगचा अभ्यास करा

बँक पीओ परीक्षेत तार्किक तर्काचे प्रश्न विचारले जातात. लॉजिकल रिझनिंगमध्ये तोंडी प्रश्न असतात. रिजनिंगमध्ये रक्ताचे नाते, आसनव्यवस्था, कोडिंग-डिकोडिंग यासंबंधीचे प्रश्नही विचारले जातात. म्हणूनच याबद्दलचे सर्व प्रश्न आणि लॉजिक्सचा अभ्यास करा.

Exam Tips: विद्यार्थ्यांनो, बोर्डाच्या परीक्षांची भीती नको; हसत खेळत करा अभ्यास

इंग्लिशला स्किप करू नका

बँक परीक्षांच्या तयारीसाठी इंग्रजी विषय महत्त्वाचा मानला जातो. यामध्ये व्याकरण आणि शब्दसंग्रह, रिक्त जागा भरा, वाक्यांश आणि मुहावरे, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष काल, उतारा, चूक सुधारणे इत्यादी विभागाशी संबंधित प्रश्न देखील विचारले जातात. म्हणुनच लँग्वेजला स्किप करू नका.

क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिट्यूडचीही तयारी आवश्यक

या भागासाठी शॉर्टकट सूत्रे आणि युक्त्या जाणून घेणे महत्त्वाचे आहे. पेपरचा मुख्य भाग म्हणजे डेटा इंटरप्रिटेशन. यामध्ये वर्गमूळ, घनमूळ, भागीदारी, टक्केवारी, गुणोत्तर आणि प्रमाण यासंबंधीचे प्रश्न टॅब्युलेशन, पाई चार्ट, लाइन चार्ट, रेषा आलेख आणि बार चार्टसह विचारले जातात.

IMP: मुलाखतीदरम्यान Salary Expectations च्या प्रश्नाला घाबरु नका; असं द्या उत्तर

संगणकाचे पूर्ण ज्ञान ठेवा

बँकेच्या परीक्षेतील संगणकाची प्रश्नपत्रिका वीस गुणांची असते. यासाठी मूलभूत सामान्य संगणक ज्ञान, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर, डीबीएमएस, मायक्रोसॉफ्ट ऑफिस, इनपुट आणि आउटपुट उपकरणे, नेटवर्किंग आणि इंटरनेटचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे.

First published:

Tags: Bank exam, Career, Career opportunities, Tips, जॉब