Home /News /career /

3 वेळा अपयश आलं तरी हरली नाही! पती आणि कुटुंबीयांच्या साथीनं चौथ्यांदा डॉक्टर अश्वती झाल्या IAS

3 वेळा अपयश आलं तरी हरली नाही! पती आणि कुटुंबीयांच्या साथीनं चौथ्यांदा डॉक्टर अश्वती झाल्या IAS

तीनवेळा यूपीएससीमध्ये अपयश येऊन देखील कुटुंबीयांच्या मदतीने एमबीबीएस डॉक्टर ते आयएएसपर्यंतचा प्रवास अश्वती यांनी पूर्ण केला.

    मुंबई, 26 नोव्हेंबर : लग्नानंतर मुलींना आपल्या करिअरकडे लक्ष देता येत नाही असे म्हटले जाते. परंतु कुटुंबीय आणि पतीच्या साथीनं पेशानं डॉक्टर असलेल्या अश्वतींना IAS च्या तयारीसाठी पाठबळ मिळालं आणि त्यांनी यश खेचून आणलं. तीनवेळा यूपीएससीमध्ये अपयश येऊन देखील कुटुंबीयांच्या मदतीने एमबीबीएस डॉक्टर ते आयएएसपर्यंतचा प्रवास अश्वती यांनी पूर्ण केला. आज आपण अश्वती श्रीनिवास यांचा प्रेरणादायी प्रवास कसा होता जाणून घेणार आहोत. अश्वती श्रीनिवास यांनी 2019 मध्ये यूपीएससीमध्ये संपूर्ण भारतातून 40 वी रँक मिळवली होती. मूळच्या कोल्लमच्या असणाऱ्या अश्वती यांनी पती आणि कुटुंबीयांच्या मदतीने चौथ्या प्रयत्नात या परीक्षेत यश मिळवले. त्यांचं लहानपण कासरगोड मध्ये गेलं आणि शिक्षण जवाहर नवोदय, केंद्रीय विद्यालय कासरगोड आणि त्रिवेंद्रमच्या केंद्रीय विद्यालयामध्ये झाले. सुरुवातीला त्यांनी मेडिकलचं शिक्षण पूर्ण केले. श्रीगोकल मेडिकल कॉलेज अँड रिसर्च फाउंडेशनमधून एमबीबीएस पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली. यामध्ये मेडिकल सायन्स हा पर्यायी विषय घेत या परीक्षेत पाऊल ठेवलं. सुरुवातीला 3 प्रयत्नांमध्ये अपयश आल्यानंतर चौथ्यांदा त्यांनी यश मिळवलं. सुरुवातीला त्यांच्या मनात या परीक्षेविषयी कोणतेही विचार नव्हते. परंतु एकदा सुट्टीच्या कालावधीमध्ये घरी आल्यानंतर तिच्या मनात याविषयी विचार आला. तिला समाजकारणात रस असल्याने त्यांनी याविषयी विचार करत परीक्षा देण्याचा निर्धार केला. परीक्षेच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी कोणताही क्लास न लावता घरीच अभ्यास करत परीक्षा दिल्या. परंतु थोड्या फरकाने त्यांना यामध्ये अपयश आले. त्यानंतर 2017 मध्ये तिनी खासगी क्लास लावत आपल्या पतीच्या, आई वडिलांच्या आणि मित्रांच्या मदतीने परीक्षा दिली. 2018 मध्ये त्यांनी पहिल्यांदा परीक्षा दिली होती. सध्या अश्वती ट्रेनिंग घेत असून त्यांना पुढील महिन्यात पूर्वपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना संदेश दिला आहे. हे वाचा-SBI मध्ये अल्पवयीन मुलांचं बचत खातं उघडायचे आहे? फॉलो करा या 4 सोप्या स्टेप्स कोणत्याही प्रकारची चिंता आणि भीती न बाळगता तुम्ही परीक्षेस सामोरे गेल्यास तुम्हाला यश नक्कीच मिळेल असे तिने म्हटले आहे. कारकिर्दीमध्ये डॉक्टर होण्याबरोबरच त्यांनी आयएएस म्हणूनदेखील यश मिळवले आहे. या परीक्षेत यश मिळवायचे असेल तर सोशल मीडियाचा वापर कमी करण्याचे आवाहनदेखील त्यांनी विद्यार्थ्यांना केला आहे. यामध्ये विविध प्रकारच्या अभ्यास पद्धतींचा देखील तिनी उल्लेख आहे. टॉपर्सच्या मुलाखती,चालू घडामोडी आणि दररोज वृत्तपत्र वाचण्यास सांगितले आहे. मेडिकलच्या अभ्यासातील विषयांचा खूप उपयोग झाल्याचे त्यांनी सांगितले. या परीक्षेत मेडिकलमधील जवळ 14 पर्यायी विषय आहेत. त्यामुळे मेडिकलमध्ये असणाऱ्या 19 विषयांपैकी 14 विषय यूपीएससीमध्ये असल्याने आधीच थोडा अभ्यास झाल्याने या परीक्षेत फायदा झाल्याचे तिने सांगितले. मेडिकलचे विद्यार्थी जर या परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांनी या पुस्तकांचा वापर करण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Career

    पुढील बातम्या