जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / तुम्हाला बिझनेस क्षेत्र आवडतं की आयटी? Confusion ठेऊ नका; मग ग्रॅज्युएशननंतर मास्टर्ससाठी 'हे' पर्याय असतील बेस्ट

तुम्हाला बिझनेस क्षेत्र आवडतं की आयटी? Confusion ठेऊ नका; मग ग्रॅज्युएशननंतर मास्टर्ससाठी 'हे' पर्याय असतील बेस्ट

करिअर टिप्स

करिअर टिप्स

आज आम्ही तुम्हाला मास्टर करण्यासाठी नक्की MBA करावं के MCA करावं याबद्दल माहिती देणार आहोत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 06 जून: MBA मास्टर ऑफ बिझिनेस मॅनेजमेंट (Master of Business Management) किंवा MCA मास्टर ऑफ कम्प्युटर अप्लिकेशन (Master of Computer Application) या दोन्ही कोर्सद्दल तुम्ही ऐकलंच असेल. अनेकजण पदवी घेतल्यानंतर MBA कडे वळतात (How to do MBA After graduation) तर काही जण BCA नंतर MCA कडे वळतात (MCA After graduation). मात्र असेलही काही विद्यार्थी असतात ज्यांना या दोन पैकी नक्की काय करावं (MBA or MCA which is better) याबाबत संभ्रम असतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या दोन्ही कोर्सेसमधील नेमका फरक (Difference between MBA and MCA) सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेउया. नक्की काय आहे MBA? एमबीए हा 2 वर्षांचा अभ्यासक्रम आहे. कोणत्याही पदवीनंतर एमबीए करता येते. एमबीए केल्यानंतर, कोणत्याही कंपनीमध्ये व्यवस्थापक, सहाय्यक इत्यादी विविध पदांवर नोकऱ्या मिळू शकतात. जर आपण कोर्सच्या फीबद्दल चर्चा केली तर काहीही बोलणे योग्य नाही कारण संपूर्ण देशात अशा अनेक संस्था आहेत जिथून एमबीए केले जाते, ज्यांची फी प्रति सेमिस्टर 10 हजार असू शकते, तर कुठेतरी 1 लाख देखील आहे. एमबीए केल्यानंतर, तुमचा प्रारंभिक पगार 18 हजार पासून सुरू होऊ शकतो परंतु तुम्ही संबंधित अभ्यासक्रम कोणत्या महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून केला आहे यावर अवलंबून आहे. कोरोना म्हणतोय ‘पुन्हा येईन’; त्यात शाळा होताहेत सुरु; कोरोनाचे ‘हे ’ नियम पाळाच काय आहे MCA? एमसीए हा 3 वर्षांचा अभ्यासक्रम आहे. एमसीए कोणत्याही ग्रॅज्युएशननंतर करता येते पण 12वीमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे विषय असणे अनिवार्य आहे. एमसीए केल्यानंतर सॉफ्टवेअर डेव्हलपर, वेब डेव्हलपर, ग्राफिक्स डिझायनर, कॉम्प्युटर/वेब प्रोग्रामरच्या नोकऱ्या कोणत्याही आयटी कंपनीत मिळू शकतात. एमबीएप्रमाणे एमसीएचे शुल्कही निश्चित नाही. मात्र हा 3 वर्षांचा कार्यक्रम असल्याने, त्याची फी एमबीएपेक्षा थोडी जास्त असू शकते. एमसीए नंतर कॉलेज प्लेसमेंटद्वारे नोकरी मिळाली तर चांगले पॅकेज मिळते, पण प्लेसमेंटच्या काळात नोकरी मिळाली नाही तर थोडा संघर्ष करावा लागू शकतो. यामध्ये, तुमचा प्रारंभिक पगार 15 हजार पासून सुरू होऊ शकतो, जो काही काळातील अनुभवावर अवलंबून लक्षणीय वाढतो. MBA करण्यासाठी पात्रता एमबीए हा व्यवसाय आणि व्यवस्थापनाशी संबंधित अभ्यासक्रम आहे, जो व्यवसाय, विपणन, नियोजन इत्यादी विषयांमध्ये स्वारस्य असलेले लोक करू शकतात. हा कोर्स करत असताना, तुम्ही व्यवसायाच्या युक्त्या आणि योग्य व्यवस्थापन शिकून तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता किंवा तुम्ही चांगल्या पोस्टवर काम करून पैसे कमवू शकता. Interview आधी Resume च ठरवतो भविष्य; असा बनवाल तर जॉब्सची येईल लाट MCA करण्यासाठी पात्रता एमसीए हा संगणक, सॉफ्टवेअर, अभियांत्रिकी इत्यादींशी संबंधित अभ्यासक्रम असल्याने ज्यांना या विषयांमध्ये रस आहे किंवा ज्यांना आयटी क्षेत्रात आपले करिअर करायचे आहे ते ते करू शकतात. वर म्हटल्याप्रमाणे MCA ची पदवी ही BE च्या बरोबरीची आहे, म्हणजेच ज्यांना काही कारणास्तव अभियांत्रिकी करता आले नाही, त्यांना MCA च्या माध्यमातून अभियंतासारखे काम करून चांगला पगार मिळू शकतो..

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MBA
  • First Published :
जाहिरात
जाहिरात