मराठी बातम्या /बातम्या /करिअर /मोठी बातमी! IT क्षेत्रातील दिग्गज कंपन्या WFH बाबत घेऊ शकतात 'हा' मोठा निर्णय; वाचा काय सांगतो अहवाल

मोठी बातमी! IT क्षेत्रातील दिग्गज कंपन्या WFH बाबत घेऊ शकतात 'हा' मोठा निर्णय; वाचा काय सांगतो अहवाल

Cognizant करणार कर्मचाऱ्यांची भरती

Cognizant करणार कर्मचाऱ्यांची भरती

कोणत्या पद्धतीनं (Process to start office after WFH) ऑफिस सुरु होणार याबाबत संभ्रम आहे.

मुंबई,09 नोव्हेंबर: कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण देशभरात कमी होऊ लागला आहे. त्यामुळे आता गेल्या दीड वर्षांपासून सुरु असलेलं विविध कंपन्यांचं वर्क फ्रॉम होम लवकरच संपणार (Work from home ends) आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना पुन्हा ऑफिसमध्ये जावं लागणार असं दिसतंय. TCS, Infosys अशा काही टॉप IT कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा ऑफिसला (Back to office after work from home) बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कोणत्या पद्धतीनं (Process to start office after WFH) ऑफिस सुरु होणार याबाबत संभ्रम आहे.

IT उद्योगातील सर्वोच्च संस्था, NASSCOM ने केलेल्या सर्वेक्षणात (NASSCOM survey about WFH) असं नमूद केलं आहे की कर्मचारी आणि कंपनीतील वरिष्ठ अधिकारी दोघांनाही कामाच्या ठिकाणी पुनरागमन करण्यात समान रस आहे. मात्र कार्यालयात पुनरागमन शक्यतो हायब्रीड शेड्यूलवर असेल ज्यामध्ये वर्क फ्रॉम होम (Work From Home End) आणि ऑफिस दोन्ही कामांचा समावेश असेल.

NASSCOM च्या अहवालात नमूद केलं आहे की 25 वर्षांखालील कर्मचार्‍यांना कामाच्या ठिकाणी परत येण्यास सर्वाधिक रस आहे आणि त्यानंतर 40 वरील वयोगटांचा क्रमांक लागतो. तसंच महिला प्रोफेशनल्सना कामाच्या ठिकाणी परत येण्यात आणि नवीन कामाच्या मॉडेल्सशी जुळवून घेण्यात तितकाच रस आहे. सर्वेक्षणाच्या निष्कर्षांवरून असं दिसून आलं आहे की सुमारे 72% कंपन्या पुढील वर्षीपासून त्यांच्या 50% कर्मचारी कार्यालयात परत येण्याकडे लक्ष देत आहेत.

L&T Recruitment: मोठी इंजिनिअरिंग कंपनी L&T महिलांना देणार नोकरीची संधी; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

दरम्यान टीसीएस (TCS), इन्फोसिस (Infosys), विप्रो (Wipro) आणि इतर आयटी कंपन्यांनी (IT companies will end WFH) आधीच त्यांच्या वरिष्ठ सहयोगींना आठवड्यातून किमान दोनदा ऑफिस डेस्कवर बोलवणं सुरू केलं आहे. त्यामुळे आता ऑफिस संपूर्णपणे सुरु न करता आठवड्यातून किमान दोन ते तीन दिवस ऑफिसमध्ये आणि इतर दिवशी वर्क फ्रॉम होम असं हायब्रीड मॉडेल (What is Hybrid model for It companies) कंपन्या राबवतील अशी चिन्हं दिसत आहेत.

या विषयावर बोलताना, नॅसकॉमचे अध्यक्ष, देबजानी घोष म्हणाले की, उद्योग आता हायब्रीड ऑपरेटिंग मॉडेल (Hybrid operating Model) पूर्ण करण्याचा विचार करत आहे जे ऑनसाइट आणि रिमोट ऑपरेटिंग मॉडेल्समध्ये सर्वोत्कृष्ट आणते.

First published:
top videos

    Tags: Career, Work from home