मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

L&T Recruitment: मोठी इंजिनिअरिंग कंपनी L&T महिलांना देणार नोकरीची संधी; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

L&T Recruitment: मोठी इंजिनिअरिंग कंपनी L&T महिलांना देणार नोकरीची संधी; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

ज्या महिलांना ब्रेकनंतर Career करण्याची इच्छा आहे अशा महिलांना (L&T Recruitment for women 2021) हे जॉब मिळणार आहेत.

ज्या महिलांना ब्रेकनंतर Career करण्याची इच्छा आहे अशा महिलांना (L&T Recruitment for women 2021) हे जॉब मिळणार आहेत.

ज्या महिलांना ब्रेकनंतर Career करण्याची इच्छा आहे अशा महिलांना (L&T Recruitment for women 2021) हे जॉब मिळणार आहेत.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 08 नोव्हेंबर: इंजिनिअरिंग क्षेत्रातील नामांकित कंपनी लार्सन अँड टुब्रो (Larsen & Toubro) (L&T) नं लवकरच महिलांना नोकरी देणार असल्याची घोषणा केली आहे. रिन्यू: करिअर री-एंट्री फॉर वुमन’ (‘Renew: Career Re-entry for Women’ program.) कार्यक्रमांतर्गत L&T महिलांना नोकरी (Jobs for women in L&T) देणार आहे. ज्या महिला करिअर (career in L&T for women) ब्रेकवर आहेत अशा महिलांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे. तसंच ज्या महिलांना ब्रेकनंतर Career करण्याची इच्छा आहे अशा महिलांना (L&T Recruitment for women 2021) हे जॉब मिळणार आहेत. यासंबंधीचं वृत्त लाईव्ह मिंट' नं दिल आहे. चला तर मग जाणून घेऊया याबद्दलच्या डिटेल्स.

RENEW हा एक उपक्रम आहे जो L&T (How to get job in L&T) च्या वैविध्य आणि सर्वांसाठी समान करिअर संधींवरील दृढ विश्वासातून निर्माण झाला आहे. हे एक व्यासपीठ प्रदान करण्याचा उद्देश आहे ज्याद्वारे करिअर ब्रेकनंतर महिला व्यावसायिक कॉर्पोरेट जगतात पुन्हा प्रवेश करू शकतात आणि पुढे करिअर घडवू शकतात.

L&T अतुलनीय नेतृत्व संधी आणि प्रमोशन प्रदान करते. आमचा दृष्टीकोन कर्मचार्‍यांना आव्हानात्मक असाइनमेंट स्वीकारण्यासाठी आणि त्यांची क्षमता जाणून घेण्यासाठी सक्षम बनवण्यावर आधारित आहे असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

Amazon Recruitment: Amazon मध्ये Financial Analyst पदांसाठी जागा रिक्त

भरतीसाठी 'या' महिला कर शकतील अप्लाय

BE / BTech / MBA / LLB (First Class) किंवा CA, ICWA पर्यंत शिक्षण पूर्ण असलेल्या महिला या पदभरतीसाठी अप्लाय करू शकणार आहेत.

Audit, Finance / Accounting, Engineering – Design, Project Management, Information Technology, Human Resource Management, Legal, CSR.या विभागांमध्ये महिलांना नोकरी करण्याची संधी मिळणार आहे.

अशा पद्धतीनं होईल निवड

इच्छुक उमेदवारांनी कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाईटवर नोंदणी करायची आहे आणि त्यांच्या Resume ची प्रत जोडायची आहे.

यानंतर सर्व बायोडेटा हे उमेदवारांच्या शिक्षणानुसार आणि विभागानुसार तपासले जातील आणि यातून काही उमेदवारांची निवड करण्यात येईल.

ज्या उमेदवारांची निवड करण्यात आली आहे अशा उमेदवारांची टेलिफोनिक मुलाखत घेतली जाईल.

यानंतर टेलिफोनिक मुलाखतीत निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची पर्सनल मुलाखत होणार आहे. Hiring Managerआणि Department Head यांच्याकडून ही मुलखात घेतली जाणार आहे.

First published:

Tags: Career opportunities, जॉब