उस्मानाबाद, 13 जुलै: महावितरण (Mahavitaran Apprentice Recruitment 2021) उस्मानाबाद (Osmanabad) इथे लवकरच तब्बल 98 पदांसाठी भरती होणार आहे. याठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इलेक्ट्रिशिअन (Electrician), वायरमन (Wireman) आणि कम्प्युटर ऑपरेटर (Computer Operator) या Apprentice पदांसाठी ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी महावितरण उस्मानाबादच्या अधिकृत ई-मेल आयडी वर अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2021 असणार आहे.
या जागांसाठी भरती
इलेक्ट्रिशियन (Electrician) - 39
वायरमन (Wireman) - 39
संगणक चालक (Computer Operator) - 20
एकूण जागा - 98
हे वाचा - AIIMS Recruitment 2021: AIIMS कल्याणी इथे प्राध्यापक पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता
इलेक्ट्रिशियन (Electrician) - ITI किंवा NCVT इलेक्ट्रिशियन
वायरमन (Wireman) - ITI किंवा NCVT वायरमन
संगणक चालक (Computer Operator) - ITI किंवा NCVT कम्प्युटर ऑपरेटर
ऑनलाईन अर्ज पाठ्वणायचा ई-मेल आयडी
obadmsedcl.apprentice@gmail.com या मेल आयडीवर आवश्यक कागदपत्रांसह मेल पाठवायचा आहे.
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 17 जुलै 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Jobs, Mseb