राहुरी (अहमदनगर), 14 ऑगस्ट: महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी अहमदनगर (Mahatma Phule Krishi Vidyapeeth Ahmednagar) इथे लवकरच विविध पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. डिझायनर, संशोधन सहाय्यक, विद्युत अभियंता, प्रशासन कर्मचारी/लेखापाल, प्रयोगशाळा सहाय्यक, वेल्डर कम फिटर, फॅब्रिकेशन मदतनीस आणि कामगार या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2021 असणार आहे.
या पदासाठी भरती
डिझायनर (Designer)
संशोधन सहाय्यक (Research Assistant)
विद्युत अभियंता (Electrical Engineer)
प्रशासन कर्मचारी/लेखापाल (Admin Staff/Accountant)
प्रयोगशाळा सहाय्यक (Lab Assistant)
वेल्डर कम फिटर (Welder Cum Fitter)
फॅब्रिकेशन मदतनीस (Fabrication Helper)
कामगार (Labor)
हे वाचा - डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे इथे नोकरीची सुवर्णसंधी; असा करा अर्ज
शैक्षणिक पात्रता
डिझायनर (Designer) - BE मेकॅनिकल आणि चार वर्षांचा डिझायनिंगचा अनुभव आवश्यक.
संशोधन सहाय्यक (Research Assistant) - Bsc केमेस्ट्री आणि तीन वर्षांचा अनुभव आवश्यक.
विद्युत अभियंता (Electrical Engineer) - BE इलेक्ट्रिकल आणि एक वर्षाचा अनुभव आवश्यक.
प्रशासन कर्मचारी/लेखापाल (Admin Staff/Accountant) - B.com. आणि दोन वर्षांचा अनुभव आवश्यक.
प्रयोगशाळा सहाय्यक (Lab Assistant) - बारावी आणि तीन वर्षांचा अनुभव आवश्यक.
वेल्डर कम फिटर (Welder Cum Fitter) - ITI आणि दोन वर्षांचा अनुभव आवश्यक.
फॅब्रिकेशन मदतनीस (Fabrication Helper) - दहावी आणि एक वर्षाचा अनुभव आवश्यक.
कामगार (Labor) - दहावी उत्तीर्ण.
मुलाखतीचा पत्ता
कृषीशास्त्रज्ञ, प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्र, श्री शाहू मार्केट यार्ड समोर, कोल्हापूर 416005.
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी http://mpkv.ac.in/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmednagar, Career opportunities, Jobs