जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Maharashtra Talathi Bharti: सरकारी नोकरी हवीये ना? लवकरच सुरु होणार रजिस्ट्रेशन्स; त्याआधी हे डॉक्युमेंट्स ठेवा रेडी

Maharashtra Talathi Bharti: सरकारी नोकरी हवीये ना? लवकरच सुरु होणार रजिस्ट्रेशन्स; त्याआधी हे डॉक्युमेंट्स ठेवा रेडी

हे डॉक्युमेंट्स ठेवा रेडी

हे डॉक्युमेंट्स ठेवा रेडी

या भरतीसाठीची नेमकी पात्रता काय? आणि भरती परीक्षेसाठी नेमकी काय कागदपत्रं आवश्यक असणार आहेत हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 13 जानेवारी: महाराष्ट्र राज्य सरकारकडून नुकतीच तलाठी पदासाठीच्या तब्बल 4122 जागांच्या आपदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. विविध शहरांमधील शेकडो जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. जिल्ह्यांप्रमाणे आणि झोनप्रमाणे भरती होणार असलेल्या जागांची माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. पण या भरतीसाठीची नेमकी पात्रता काय? आणि भरती परीक्षेसाठी नेमकी काय कागदपत्रं आवश्यक असणार आहेत हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. या पदांसाठी भरती विविध जिल्ह्यांतील तलाठी (Talathi) एकूण जागा - 4122 आहात कुठे? जॉब हवाय ना? मग पुणे महापालिकेत या जागांसाठी सुरु झाल्यात मुलाखती; पत्त्यावर राहा हजर शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे 18 ते 38 दरम्यान असणं आवश्यक आहे. SC/ST/PWD/OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी शिथिलता देण्यात येणार आहे. Indian Railway Recruitment: 10वी पासना लागणार सरकारी जॉबची लॉटरी; 1-2 नव्हे तब्बल 4103 जागांसाठी बंपर भरती इतका मिळणार पगार विविध जिल्ह्यांतील तलाठी (Talathi)- 5,200/- ते रु. 20,200/-.रुपये प्रतिमहिना Maharashtra Police Bharti: शारीरिक क्षमता तर दाखवलीत; आता बौद्धिक क्षमतेची वेळ; 90 मिनिटांत ठरेल भविष्य

News18लोकमत
News18लोकमत

ही कागदपत्रं असणं आवश्यक 10वी / SSC गुणांची यादी स्कॅन केलेला फोटो शैक्षणिक कागदपत्रे (गुणपत्रिका, हस्तांतरण प्रमाणपत्र, तात्पुरते प्रमाणपत्र इ.) मेल आयडी आणि फोन नंबर जातीचे प्रमाणपत्र (जर तुम्ही आरक्षित श्रेणीत असाल) नॉन क्रिमीलेयर सर्टिफिकेट (गरज असल्यास) अपंगत्व प्रमाणपत्र (तुम्हाला कोणतेही अपंगत्व असल्यास) जन्मतारीख प्रमाणपत्र स्कॅन केलेली स्वाक्षरी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात