मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

विद्यार्थ्यांनो लागा तयारीला! पोलीस भरतीनंतर राज्यात तलाठी पदांची बंपर भरती

विद्यार्थ्यांनो लागा तयारीला! पोलीस भरतीनंतर राज्यात तलाठी पदांची बंपर भरती

राज्यात तलाठी पदांची बंपर भरती

राज्यात तलाठी पदांची बंपर भरती

महाराष्ट्रातील तरुणांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 7 डिसेंबर : अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर राज्यात 18 हजार पोलीस पदांची भरती होणार आहे. यासाठीचे अर्ज मागवण्यात आले आहे. यानंतर महाराष्ट्रातील तरुणांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यात पोलीस पाठोपाठ तलाठी भरतीचा जीआरही प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे तलाठी होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

तलाठी भरताची जीआर प्रसिद्ध

तलाठी भरती 2022 चा जीआर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात तब्बल 3110 तलाठी आणि 511 मंडळ अधिकारी पदांना मान्यता देण्यात आली आहे. यासंबंधित जाहिरात ही डिसेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा जानेवारी महिन्यात अपेक्षित आहे. त्यामुळे तरूणांसाठी नोकरीची नवी संधी होणार आहे.

राज्यभरात 3110 तलाठी तर 511 मंडळ अधिकारी पदे भरली जाणार आहेत. डिसेंबर महिन्यातच नोकरीची जाहिरात निघणार असल्याचीही माहिती आहे. राज्यातील तलाठी भरतीचा हा जीआर महसूल विभागाने काढला. पोलीस भरतीपाठोपाठ आता तलाठी भरतीचाही जीआर प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे राज्यातील तरुणांना नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. तलाठी होण्याचे तरुणांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून अनेक जिल्ह्यातील तलाठी पदे भरली गेली नाहीत. यासाठी नुकताच शासन निर्णय पारित करण्यात आला आहे. तलाठी भरती न झाल्याने कामकाजाचा भार वाढत चालला आहे.

वाचा - शिक्षणासाठी परदेशात गेलात पण पैसेच संपले? चिंता नको; असं करा पैशांचं मॅनेजमेंट

तलाठी भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्था अथवा विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे. तसेच राज्य सरकारच्या सर्व अटी आणि शर्थींचे पालन करणे गरजेचे आहे.

पोलीस भरतीसाठी अर्जाची मुदत वाढवली

राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत 11.80 लाख अर्ज प्राप्त झाले असल्याचे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे.

First published:

Tags: Police, State goverment