पुणे, 16 सप्टेंबर: महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी (Maharashtra State Electricity Transmission Company) पुणे (Pune Latest Jobs) इथे दहावी आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MahaTransco Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. इलेक्ट्रिशियन अप्रेन्टिस या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
इलेक्ट्रिशियन अप्रेन्टिस (Apprentice Electrician) - एकूण जागा 21
MahaTransco Recruitment 2021
हे वाचा - Pune Jobs: विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण पुणे इथे नोकरीची सुवर्णसंधी; 'हे' उमेदवार असतील पात्रपात्रता आणि अनुभव
इलेक्ट्रिशियन अप्रेन्टिस (Apprentice Electrician) - या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाच्या गरजेनुसार ITI प्रशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया
यासाठी उमेदवारांचे दहावीचे गुण आणि ITI मधील चारही सत्रांच्या गुणांची बेरीज करून सरासरी काढण्यात येईल. त्यानुसार उमेदवरांची निवड केली जाईल. इतर कुठलेही गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत.
आवश्यक कागदपत्रं
पासपोर्ट साईझ फोटो
कोणतंही एक ओळखपत्र
ऑनलाईन रजिस्ट्रेशनची कागदपत्रं
शैक्षणिक पात्रतेसंबंधीची कागदपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
मागासवर्गीय असल्यास जात प्रमाणपत्र
या सर्व कागदपत्रांची एक प्रत सोबत बाळगणं आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 सप्टेंबर 2021
JOB TITLE
MahaTransco Recruitment 2021
या पदांसाठी भरती
इलेक्ट्रिशियन अप्रेन्टिस (Apprentice Electrician) - एकूण जागा 21
पात्रता आणि अनुभव
इयत्ता दहावी उत्तीर्ण+ ITI
निवड प्रक्रिया
दहावीचे गुण आणि ITI मधील चारही सत्रांच्या गुणांची बेरीज करून सरासरी काढण्यात येईल. त्यानुसार उमेदवरांची निवड केली जाईल.
आवश्यक कागदपत्रं
पासपोर्ट साईझ फोटो
कोणतंही एक ओळखपत्र
ऑनलाईन रजिस्ट्रेशनची कागदपत्रं
शैक्षणिक पात्रतेसंबंधीची कागदपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
मागासवर्गीय असल्यास जात प्रमाणपत्र
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.