जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / SSC Exam 2023: 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; आजच जारी होणार परीक्षेसाठी हॉल तिकिट्स; बघा वेबसाईट

SSC Exam 2023: 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; आजच जारी होणार परीक्षेसाठी हॉल तिकिट्स; बघा वेबसाईट

आजच जारी होणार परीक्षेसाठी हॉल तिकिट्स

आजच जारी होणार परीक्षेसाठी हॉल तिकिट्स

महाराष्ट्र स्टेट बोर्ड दहावीची परीक्षा ही दिनांक 2 मार्च ते 25 मार्च 2023 या दरम्यान घेण्यात येणार आहे. त्यानुसार हॉल तिकिट्स जारी करण्यात येणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 06 फेब्रुवारी: महाराष्ट्र स्टेट बोर्ड परीक्षा 2023 देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र स्टेट बर्ड दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हॉल तिकिट्स आजपासून उपलब्ध होणार आहेत अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षा मार्च 2023 साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र स्टेट बोर्ड दहावीची परीक्षा ही दिनांक 2 मार्च ते 25 मार्च 2023 या दरम्यान घेण्यात येणार आहे. त्यानुसार आज दिनांक 06 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 3 वाजता पासून कॉलेज लॉगइन मधून हे हॉल तिकिट्स उपलब्ध असणार आहेत. www.mahahssscboard.in या वेबसाईटवर ही प्रवेशपत्रं उपलब्ध असणार आहेत. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा असं आवाहन बोर्डाकडून करण्यात आलं आहे. IT Jobs: या मोठ्या आयटी कंपनीत Work From Home ची सुवर्णसंधी; पात्र असाल तर लगेच करा अप्लाय मार्च 2023 साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळांनी इ.10 वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायची आहेत. तसंच प्रवेशपत्र ऑनलाईन पध्दतीने प्रिटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी असंही बोर्डानं आपल्या नोटीसमध्ये म्हंटलं आहे. Competitive Exams: MPSC असो वा NEET कोणतीही स्पर्धा परीक्षा एका झटक्यात होईल क्रॅक; अशी करा स्मार्ट स्टडी हॉल तिकिट्समध्ये काही चूक असल्यास? प्रवेशपत्रामध्ये विषय किंवा माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यायच्या आहेत. प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करुन त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवायाची आहे असंही सांगण्यात आलं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

प्रवेशपत्रं हरवलं तर? प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित उच्च माध्यमिक शाळांनी पुन्हा ‘प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत असा शेरा देऊन विदयार्थ्यांना दुसरं प्रवेशपत्रं द्यावं असं सांगण्यात आलं आहे. तसंच फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात