मुंबई, 08 जून: गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेला विषय म्हणजे दहावी आणि बारावी स्टेट बोर्डाचे निकाल. अखेर आज म्हणजेच 08 जुने 2022 ला स्टेट बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. यंदा तब्बल दोन वर्षांनी ऑफलाईन परीक्षा झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली आहे. तसंच विद्यार्थ्यांच्या पालकांनाही प्रचंड टेन्शन आलं होतं. मात्र आता निकाल अखेर जाहीर झाला आहे. तुम्ही आता तुमचा निकाल ऑनलाईन पद्धतीनं News18lokmat.com वेबसाईटवर बघू शकणार आहात. खाली विचारण्यात आलेली माहिती भरून तुम्ही तुमचा निकाल बघू शकणार आहात.
निकालाचे काही IMP अपडेट्स
महाराष्ट्र स्टेट बोर्ड बारावीचा निकाल हा अखेर जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये बारावीचा एकूण निकाल 94.22% इतके टक्के लागला आहे. राज्यातून सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा लागला आहे. त्यानुसार आता बारावीतही कोकण वोभाग्न आपला रेकॉर्ड कायम ठेवला आहे. बारावीच्या निकालातही कोकण विभागाचा निकाल तब्बल 97.21 टक्के लागला आहे. सर्वात कमी निकाल हा मुंबई विभागाचा लागला आहे. मुंबई विभागाचा निकाल 90.91% टक्के लागला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.