जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / पुन्हा सावळा गोंधळ; मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना चक्क आली इंग्लिश प्रश्नपत्रिका; सेंटर चालकांवर भाषांतराची वेळ

पुन्हा सावळा गोंधळ; मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना चक्क आली इंग्लिश प्रश्नपत्रिका; सेंटर चालकांवर भाषांतराची वेळ

सेंटर चालकांवर भाषांतराची वेळ

सेंटर चालकांवर भाषांतराची वेळ

बारावीचा कॅम्पुटर टेक्निक विषयाचा पेपर द्यायला आलेल्या मराठी मिडीयमच्या विद्यार्थ्यांना चक्क इंग्लिश मिडीयमची प्रश्नपत्रिका आली आणि एकच गोंधळ उडाला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 28 फेब्रुवारी: महाराष्ट्र स्टेट बोर्डाची बारावीची परीक्षा सध्या सुरु आहे. मात्र यंदाच्या परीक्षेत बोर्डाकडून होणाऱ्या चुका काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. अंबेजोगाई इथे अशीच एक घटना आहे. बारावीचा कॅम्पुटर टेक्निक विषयाचा पेपर द्यायला आलेल्या मराठी मिडीयमच्या विद्यार्थ्यांना चक्क इंग्लिश मिडीयमची प्रश्नपत्रिका आली आणि एकच गोंधळ उडाला. मिळालेल्या माहितीनुसार, काल म्हणजेच 27 फेब्रुवारीला बारावीचा कॅम्पुटर टेक्निक नावाचा पेपर होता. यानुसार विद्यार्थी सेंटरवर परीक्षा द्यायलाही आलेत. मात्र प्रश्नपत्रिका हातात येताच सर्वच विद्यार्थ्यांना धक्का बसला. मराठीतून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना चक्क इंग्लिश माध्यमाची प्रश्नपत्रिका आली होती. यानंतर विद्यार्थ्यांनी संबंधित शिक्षकांना याबद्दल सांगितलं. मात्र यामुळे स्टेट बोर्डाचा सावळा गोंधळ पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. Latur Pattern : लातूर पॅटर्न वापरा, दहावीच्या विज्ञानातही चांगले मार्क्स मिळवा! Video संबंधित घडलेला प्रकार लक्षात येताच सेंटरवर सेंटर चालकांचा आणि स्टाफचाही गोंधळ उडाला. आता करायचं तरी काय? विचार केला असता शेवटी सेंटर चालकांना इंग्लीह मिडीयमचा पेपर मराठीत भाषांत करावा लागलं आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना सोडवण्यास देण्यात आला. तुमच्या मुलांनी परीक्षेत नेहमी टॉप करावं असं वाटतं ना? मग पालकांनो ‘या’ चुका कधीच करू नका या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचा संताप झाला आहे. त्यात सेंटर चालकांवर मराठी प्रश्नपत्रिका उपलब्ध न झाल्यामुळे चक्क इंग्रजीचे प्रश्न मराठीत ट्रान्सलेट करण्याची वेळ आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा दिली. मात्र बोर्डाकडून चुकीचा हा काही या वर्षीचा पहिला प्रकार नाही.

News18लोकमत
News18लोकमत

या आधीही झाल्या चुका या आधी इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये प्रश्नाऐवजी चाक उत्तर छापून आल्याचा प्रकार घडला आहे. तर हिंदीच्या पेपरमध्येही चूक झाल्याचा प्रकार आढळून आला आहे. यंदाच्या बोर्डाच्या परीक्षेत बोर्डाकडून होणाऱ्या चुकांमुळे विद्यार्थ्यांना करावा लागतो आहे. तसंच फ्री मार्क्स मिळत असले तरी विद्यार्थ्यांचा वेळ वाया जातो आहे. त्यामुळे या चुकांकडे बोर्डानं गांभीर्यानं बघणं महत्त्वाचं आहे असं पालकांचं मत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात