मुंबई, 02, जून: गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेला विषय म्हणजे दहावी आणि बारावी स्टेट बोर्डाचे निकाल. अखेर आज म्हणजेच 02 जूनला 2023 ला स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल (Maharashtra state board 10th Result 2023) जाहीर झाला आहे. यंदा निकाल कमी लागल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली आहे. तसंच विद्यार्थ्यांच्या पालकांनाही प्रचंड टेन्शन आलं आहे.आज दुपारी एक वाजता हा निकाल तुम्ही ऑनलाईन जाहीर झाला आहे. पण या निकालात तुम्हाला काहीही त्रुटी आढळल्या किंवा मनासारखे मार्क्स मिळाले मिळाले नाहीत तर चिंता करू नका. तुम्ही तुमचे पेपर्स रिचेकिंगला देऊ शकता. याची संपूर्ण प्रक्रिया आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
12वी विसरा; दहावीनंतरच्या ‘या’ भन्नाट डिप्लोमा कोर्सेसबद्दल ऐकलंय का? लाखो रुपये मिळेल सॅलरी अशी असेल रिचेकिंग प्रोसेस पेपर रिचेकिंगला देण्यासाठी आधी विद्यार्थ्यांना आधी ऑफिशिअल या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करायची आहे. यानंतर विद्यार्थ्यांना रिचेकिंगसाठी त्यांचे अर्ज करायचे आहेत. यानंतर विवद्यार्थ्यांचे पेपर्स गुण मूल्यांकनाला जाणार आहेत. यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या पेपर्सच्या छायाप्रत मिळणार आहेत. यानंतरही पेपरमध्ये काही शंका असल्यास विद्यार्थ्यांना त्यांच्या पेपर्सना रिचेकिंग ला देता येणार आहे. SSC Result 2023: लक्ष द्या! 10वीनंतर फक्त 12वी हाच पर्याय नाही; ‘हे’ शॉर्ट टर्म कोर्सेस करूनही होऊ शकता मालामाल
यंदाच्या निकालाच्या टॉप 10 गोष्टी कोकण विभागाचा सर्वाधिक 98.11 टक्के निकाल सर्वात कमी नागपूर विभागाचा 92.67 टक्के निकाल लातूर पॅटर्न पुन्हा एकदा ठरला अव्वल, 108 विद्यार्थ्यांचा निकाल 100 टक्के राज्यात 100 टक्के मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 151 मुलींनी मारली बाजी दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 98 टक्के राज्यातील तब्बल 43 शाळा, त्यांचा निकाल हा शुन्य लागला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल राज्यात सर्वाधिक 98.54 टक्के यंदा परीक्षेला 23 विद्यार्थी तृतीय पंथी प्रवर्गातून बसले होते दहावीच्या निकालाचा टक्का 3.11 ने घसरला