जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Maharashtra Police Bharti: सर्वात मोठी अपडेट समोर; 'या' तारखेला होणार 1 लाख 84 हजार उमेदवारांची लेखी परीक्षा

Maharashtra Police Bharti: सर्वात मोठी अपडेट समोर; 'या' तारखेला होणार 1 लाख 84 हजार उमेदवारांची लेखी परीक्षा

'या' तारखेला होणार 1 लाख 84 हजार उमेदवारांची लेखी परीक्षा

'या' तारखेला होणार 1 लाख 84 हजार उमेदवारांची लेखी परीक्षा

ही लेखी परीक्षा कधी होणार याबाबत उमेदवारांकडून विचारणा करण्यात येत आहे. मात्र आता पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 02 मार्च: महाराष्ट्र पोलीस भरती सुरु आहे यामधील मैदानी परीक्षेचा पहिला टप्पा हा पूर्ण झाला आहे. पोलीस भरतीत सुरुवातीला मैदानी परीक्षा आणि त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे. पोलिस शिपाई व चालक पदांची भरती प्रक्रियेतील मैदानीचा पहिला टप्पा संपला आहे. मात्र लेखी परीक्षा कधी होणार याबाबत उमेदवारांना अजुनही संभ्रम आहे. लेखी परीक्षांच्या तारखा अजूनही जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ही लेखी परीक्षा कधी होणार याबाबत उमेदवारांकडून विचारणा करण्यात येत आहे. मात्र आता पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. शारीरिक चाचणी आणि कौशल्य चाचणीमध्ये विहित गुणांनी उत्तीर्ण झालेल्या आणि लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा लवकरच घेतली जाणार आहे. दिनांक 19 मार्चला दुपारी 11.00 ते 01.00 या वेळेत ही लेखी परीक्षा घेण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. Agniveer Bharti: अवघ्या 7 मिनिटांमध्ये धावावं लागेल 1.6 किमी; असे असतील महिला अग्निवीरांसाठी निकष राज्यात 18 हजार 331 पोलिस शिपाई व चालक पदांची भरती प्रक्रियेतीलमैदानी प्रक्रिया झालीय. मात्र तृतीपंथींच्या मैदानी चाचणीचे निकष अजूनही निश्चित झाले नाहीत. त्यासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. 72 तृतीयपंथींची मैदानी चाचणी रखडल्याने 1 लाख 84 हजार उमेदवारांची लेखी परीक्षा लांबणीवर पडली आहे. IAF Agniveer Bharti: वायुसेनेत लवकरच सुरु होणार अग्निवीरांची भरती; तुम्ही आहात का एलिजिबल? बघा मैदानी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांपैकी एका पदासाठी 10 उमेदवारांची मेरिटनुसार लेखी परीक्षेसाठी निवड होणार आहे. त्यानुसार 1 लाख 83 हजार 310 उमेदवार लेखीसाठी पात्र ठरतील. मात्र तृतीयपंथींची मैदानी परीक्षा झाल्याशिवाय पोलीस भरतीच्या उमेदवारांची लेखी परीक्षा होणार नाहीये. निकष ठरल्यानंतर मार्चमध्ये त्यांची मैदानी चाचणी पार पडेल. दुसरीकडे दहावी-बारावीसह बहुतेक विद्यापीठांच्या परीक्षांमुळे केंद्रे उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे पोलिस भरतीची लेखी परीक्षा एप्रिल महिन्यात होऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

अशी असेल लेखी परीक्षा 100 वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल जी 90 मिनिटांत पूर्ण करावी लागेल PST आणि PST फेरी 50 गुणांची असेल आणि पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदारांनी परीक्षेत किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे. लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटांचा असेल व मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील. चुकीच्या उत्तरास गुण कपात करण्यात येणार नाहीत. परीक्षा मराठीतूनच होणार आहे. परीक्षेचा एकूण कालावधी 1:30 तासांचा आहे. त्यामध्ये 100 प्रश्न असतील ज्यात प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 गुण दिला जाईल. पोलीस भारती 2022 च्या प्रश्नपत्रिकेत चार स्वतंत्र विभाग असतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात