जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Maharashtra Police Bharti: राज्यात बेरोजगारीची भीषणता; पोलीस कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर पदांसाठी डॉक्टर्स, इंजिनीअर्सचे अर्ज

Maharashtra Police Bharti: राज्यात बेरोजगारीची भीषणता; पोलीस कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर पदांसाठी डॉक्टर्स, इंजिनीअर्सचे अर्ज

Maharashtra Police Bharti: राज्यात बेरोजगारीची भीषणता; पोलीस कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर पदांसाठी डॉक्टर्स, इंजिनीअर्सचे अर्ज

कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांमध्ये होमिओपॅथी आणि आयुर्वेद पदवीधारकांपासून ते पोस्ट ग्रॅज्युएट, लॉ, मॅनेजमेंट, कॉम्प्युटर अॅप्लिकेशन आणि सायन्स या विषयांतील पदवीधरांचा समावेश आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 13 जानेवारी: आपल्या देशात बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचं चित्र आहे. साधारण शिक्षण असलेल्या तरुणांसोबतच हजारो उच्चशिक्षित तरुणदेखील नोकरीच्या शोधात फिरताना दिसत आहेत. पुणे पोलीस दलातील नोकरभरतीच्या प्रक्रियेत बेरोजगारीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे पोलीस दलानं कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर पदांसाठी कर्मचारी भरती सुरू केली आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांपैकी तीन हजार 238 जण उच्चशिक्षित असल्याचं समोर आलं आहे. कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांमध्ये होमिओपॅथी आणि आयुर्वेद पदवीधारकांपासून ते पोस्ट ग्रॅज्युएट, लॉ, मॅनेजमेंट, कॉम्प्युटर अॅप्लिकेशन आणि सायन्स या विषयांतील पदवीधरांचा समावेश आहे. ही परिस्थिती बघता बेरोजगारीची स्थिती किती गंभीर आहे, हे लक्षात येतं. विशेषत: स्थिरतेसाठी ग्रामीण महाराष्ट्रातील तरुण जास्त संघर्ष करत असल्याचं दिसतं. ‘टाइम्स ऑफ इंडिया’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. Maharashtra Talathi Bharti: सरकारी नोकरी हवीये ना? लवकरच सुरु होणार रजिस्ट्रेशन्स; त्याआधी हे डॉक्युमेंट्स ठेवा रेडी पुणे पोलीस दलात ड्रायव्हरची भरती प्रक्रिया 3 जानेवारीपासून सुरू झाली असून कॉन्स्टेबलची भरती 18 जानेवारीपासून सुरू होणार आहे. कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हरच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी किमान पात्रता बारावी उत्तीर्ण आहे. आत्तापर्यंत कॉन्स्टेबलच्या 720 आणि ड्रायव्हरच्या 72 पदांसाठी एकूण 73 हजार 242 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. भरती प्रक्रियेचं पर्यवेक्षण करणारे गुन्हे विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं, “कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हरच्या पदांसाठी अर्ज करणारे बॅचलर आणि मास्टर्स पदवी असलेले तरुण आपापल्या क्षेत्रात एकदम हुशार आहेत. ते फक्त चालाख आणि हुशार नसून शारीरिक आणि लेखी परीक्षांमध्येही त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्या शारीरिक ताकदीमुळे ते पोलीस दलामध्ये सहभागी होण्यास पात्र ठरत आहेत. अशा उमेदवारांकडे एमपीएससी आणि यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये बसण्याची संधी आहे.” आहात कुठे? जॉब हवाय ना? मग पुणे महापालिकेत या जागांसाठी सुरु झाल्यात मुलाखती; पत्त्यावर राहा हजर निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित म्हणाले, “खाकी गणवेश घालण्याच्या आकर्षणामुळे उच्चशिक्षित तरुण पोलीस दलात सामील होण्याचा विचार करतात. पोलीस दलात सामील होणं ही इतर नोकऱ्यांच्या तुलनेत नक्कीच जास्त मानाची सेवा आहे. पोलीस कर्मचाऱ्याला कर्तव्य बजावताना स्वातंत्र्य मिळतं आणि गणवेश हा प्रतिष्ठेचा एक भाग असतो. पुणे पोलीस दलात सहभागी झालेले कर्माचारी पुण्यात कायमस्वरूपी सेवा देऊ शकतात. सरकारनं कॉन्स्टेबल पदासाठी वयोमर्यादा वाढवली आहे. कॉन्स्टेबल भरतीसाठीचे शैक्षणिक निकष हे 12 वी इयत्तेपेक्षा जास्त आणि पदवीपेक्षा कमी असावेत.” आझम कॅम्पसमधील स्पर्धा परीक्षा कक्षाचे प्रभारी इजाज बागवान म्हणाले, “अजूनही अनेकांना सरकारी नोकऱ्या मिळवण्याची क्रेझ आहे. कारण, सरकारी नोकरी व्यक्तीला आर्थिक सुरक्षितता, राहण्याची सोय आणि वैद्यकीय कवच यासारख्या सुविधा पुरवते. खासगी सेवेप्रमाणे नोकरी गमावण्याची भीती सरकारी नोकरीमध्ये नसते.”

News18लोकमत
News18लोकमत

सध्या पुण्यातील दत्तवाडी येथे राहणारा आणि मूळचा यवतमाळ येथील असणारा सुफियान शेख (वय 22) म्हणाला, “मी एमए द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. माझी शरीरयष्टी आणि सामान्य ज्ञान चांगलं आहे. माझी आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मी पोलीस भरतीमध्ये सहभागी होत आहे. ही नोकरी मला माझं शिक्षण सुरू ठेवण्यास आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यास मदत करेल.” अहमदनगरमधील बाभळेश्वर तालुक्यातील गणेश बेंद्रे (वय 26) म्हणाला, “मी शेतीची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील आहे. मी कला शाखेत पदवी मिळवलेली आहे. कोरोना महामारीनंतर नोकरीच्या संधी कमी झाल्यामुळे मी आता कॉन्स्टेबल होण्यासाठी माझं नशीब आजमावत आहे.”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात