मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Maharashtra Police Bharti 2022: इथे भाषाही ठरवते भविष्य; लेखीसाठी मराठी व्याकरणाचा हा घ्या सिलॅबस

Maharashtra Police Bharti 2022: इथे भाषाही ठरवते भविष्य; लेखीसाठी मराठी व्याकरणाचा हा घ्या सिलॅबस

मराठी व्याकरणाचा हा घ्या सिलॅबस

मराठी व्याकरणाचा हा घ्या सिलॅबस

आज आम्ही तुम्हाला सर्वात महत्त्वाच्या विषयाचा म्हणजे मराठी व्याकरण या विषयाचा अभ्यासक्रम सांगणार आहोत. केला तर मग जाणून घेऊया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 10 डिसेंबर: राज्य सरकारनं तब्बल 18,000 पेक्षा अधिक पोलीस कॉन्स्टेबल भरतीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता रानातील तरुणांना पोलीस होण्याचा गोल्डन चान्स मिळणार आहे. त्यासाठीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. तसंच 9 नोव्हेंबर 2022 पासून यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मात्र ही भरती प्रक्रिया होणार तरी कशी? आणि या भरती परीक्षेचा सिलॅबस काय असणार आहे याबद्दल अनेकांना प्रश्न पडले आहेत. म्हणूनच गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या सिलॅबसनंतर आज आम्ही तुम्हाला सर्वात महत्त्वाच्या विषयाचा म्हणजे मराठी व्याकरण या विषयाचा अभ्यासक्रम सांगणार आहोत. केला तर मग जाणून घेऊया.

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 प्रक्रियेत दोन चाचण्या घेण्यात येणार आहेत. यामध्ये शारीरिक चाचणी आणि लेखी चाचणी होणार आहे. सुरुवातीला उमेदवारांची शारीरिक परीक्षा होणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षेचं आयोजन करण्यात येणार आहे. या लेखी परीक्षेत गणित, बौद्धिक चाचणी आणि मराठी व्याकरण हे विषय असणार आहेत.

Maharashtra Police Bharti: लेखी परीक्षेतील गणित म्हणजे स्वप्नातलं 'भूत'; आताच बघा सिलॅबस; अन्यथा....

Maharashtra Police Bharti: 90 मिनिटांत ठरणार तरुणांचं भविष्य; 18,000 पदांसाठी असं असेल परीक्षेचं पॅटर्न

मराठी व्‍याकरण अभ्यासक्रम 

विषय विषय 
वाक्‍यरचनावाक्‍यात उपयोग
शब्‍दार्थशब्दसंग्रह
प्रयोगसमूहदर्शक शब्द
समासप्राणी व त्यांची घरे
समानार्थी शब्‍दध्वनीदर्शक शब्द
विरुद्धार्थी शब्‍दप्राणी व त्यांची पिल्ले
म्‍हणी व वाकप्रचारप्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक

100 वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल जी 90 मिनिटांत पूर्ण करावी लागेल PST आणि PST फेरी 50 गुणांची असेल आणि पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदारांनी परीक्षेत किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे. लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटांचा असेल व मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील. चुकीच्या उत्तरास गुण कपात करण्यात येणार नाहीत. परीक्षा मराठीतूनच होणार आहे. परीक्षेचा एकूण कालावधी 1:30 तासांचा आहे. त्यामध्ये 100 प्रश्न असतील ज्यात प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 गुण दिला जाईल. पोलीस भारती 2022 च्या प्रश्नपत्रिकेत चार स्वतंत्र विभाग असतील.

Maharashtra Police Bharti: नुसते हट्टे-कट्टे असून होत नाही गड्यांनो; बौद्धिक चाचणीही IMP; जाणून घ्या सिलॅबस

मराठी व्याकरण विषयांमध्ये एकूण पंचवीस प्रश्न विचारण्यात येणार आहे. त्यापैकी प्रत्येक प्रश्नाला एक मार्कांचं वेटेज असणार आहे. तसंच एकूण मार्कांमध्ये स्कोर करण्यासाठी या विषयाचा अभ्यास करणं खूप आवश्यक असणार आहे. त्यामुळे जरी मराठी मातृभाषा असेल तरी मराठी व्याकरण सोपी नाही. म्हणून या विषयात अभ्यास करून स्कोर करणं आवश्यक आहे.

First published:
top videos

    Tags: Career, Career opportunities, Jobs Exams, Maharashtra News, Maharashtra police, Mumbai Poilce