मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात NEET UG काउन्सिलिंग झालं सुरु; कसं असेल पूर्ण शेड्युल; इथे मिळेल माहिती

महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात NEET UG काउन्सिलिंग झालं सुरु; कसं असेल पूर्ण शेड्युल; इथे मिळेल माहिती

NEET UG Counselling चं शेड्युल जारी

NEET UG Counselling चं शेड्युल जारी

महाराष्ट्र NEET काउन्सिलिंग 2022 UG नोंदणी शुल्क 23 ऑक्टोबर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत भरता येईल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 19 ऑक्टोबर: महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस, बीडीएस आणि इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी महाराष्ट्र NEET UG कौन्सिलिंग 2022 नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. ही लिंक महाराष्ट्र NEET च्या अधिकृत वेबसाइट cetcell.net.in वर उपलब्ध असेल. ऑनलाइन फॉर्मसाठी तुमच्याकडे 22 ऑक्टोबर 2022 पर्यंत असेल. यानंतर, महाराष्ट्र NEET काउन्सिलिंग 2022 UG नोंदणी शुल्क 23 ऑक्टोबर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत भरता येईल.

हे काउन्सिलिंग महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल, मुंबई महा सीईटी सेलद्वारे केले जाते. याद्वारे राज्यातील शासकीय, खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी, बीएससी नर्सिंग या अभ्यासक्रमांना प्रवेश उपलब्ध होणार आहे.

SSC Head Constable भरतीसाठी अर्ज केलाय? मग तुमचं Admit Card जारी; लगेच करा डाउनलोड

कोणत्या महाविद्यालयात किती जागा?

महा CET सेल दोन गटांमध्ये NEET UG काउन्सिलिंग आयोजित करेल. अ गटात एमबीबीएस आणि बीडीएससाठी काउन्सिलिंग केले जाईल. इतर सर्व अभ्यासक्रम गट क मध्ये ठेवले आहेत. महाराष्ट्रातील कोणत्या वैद्यकीय महाविद्यालयात या सर्व अभ्यासक्रमांसाठी किती जागा आहेत? त्याचे तपशील तुम्हाला Maha NEET UG सीट मॅट्रिक्समध्ये मिळतील. हे सीट मॅट्रिक्स 20 ऑक्टोबर रोजी अधिकृत वेबसाइट cetcell.net.in वर अपलोड केले जाईल.

उमेदवारांना महाराष्ट्र NEET UG 2022 काउन्सिलिंग साठी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती स्कॅन कराव्या लागतील आणि त्या ऑनलाइन वेबसाइटवर अपलोड कराव्या लागतील. नोंदणीनंतर अर्ज करताना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. विद्यार्थ्यांना निवडी भरण्यासाठी 27 ऑक्टोबर 2022 (सायंकाळी 5.30) पर्यंत वेळ दिला जाईल.

महाराष्ट्र NEET वाटप यादी कधी येईल?

सर्वप्रथम मुंबई CET सेल महाराष्ट्र NEET जागा वाटपाची तात्पुरती यादी प्रसिद्ध करेल. ही यादी 25 ऑक्टोबरला येईल. यानंतर 28 ऑक्टोबर रोजी पहिल्या फेरीसाठी निवड यादी प्रसिद्ध केली जाईल. यामध्ये ज्यांना जागा वाटप करण्यात येणार आहेत, त्यांनी संबंधित महाविद्यालयात पोहोचून 4 नोव्हेंबर 2022 पर्यंत प्रवेशाची औपचारिकता पूर्ण करावी लागेल.

Success Story: तब्बल 1 कोटींचं पॅकेज नाकारून तिनं सुरु केला स्वतःचा बिझनेस; आज आहे 80,000 कोटींची उलाढाल

पुढील फेऱ्यांसाठी महाराष्ट्र NEET UG सकाउन्सिलिंग चे वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाईल. ताज्या अपडेट्ससाठी CET सेल मुंबई महाराष्ट्रच्या वेबसाइटला भेट देत रहा. वेबसाइट 2022 च्या अपडेटसह सक्रिय होणार आहे. तोपर्यंत तुम्ही महाराष्ट्र NEET UG 2021 मेरिट लिस्ट (तात्पुरती) तपासू शकता.

First published:

Tags: Career opportunities, Entrance Exams, Job, Job alert, Medical exams