मराठी बातम्या /बातम्या /करिअर /SSC Head Constable भरतीसाठी अर्ज केलाय? मग तुमचं Admit Card जारी; लगेच करा डाउनलोड

SSC Head Constable भरतीसाठी अर्ज केलाय? मग तुमचं Admit Card जारी; लगेच करा डाउनलोड

कर्मचारी निवड आयोग (SSC)

कर्मचारी निवड आयोग (SSC)

SSC Head Constable भरती परीक्षा 27 आणि 28 ऑक्टोबर रोजी आयोजित करेल. परीक्षा तीन शिफ्टमध्ये ऑनलाइन घेतली जाईल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 19 ऑक्टोबर: स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) हेड कॉन्स्टेबल (असिस्टंट वायरलेस ऑपरेटर (AWO)/टेलि प्रिंटर ऑपरेटर (TPO)) भरती परीक्षा 27 आणि 28 ऑक्टोबर रोजी आयोजित करेल. परीक्षा तीन शिफ्टमध्ये ऑनलाइन घेतली जाईल.

पहिली शिफ्ट आहे सकाळी 9 ते 10:30, दुसरी शिफ्ट दुपारी 12:30 ते 2 आणि तिसरी शिफ्ट दुपारी 4 ते 5:30 अशी असेल. एकूण 1,96,717 उमेदवार परीक्षेला बसण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! UGC NET परीक्षेची आन्सर की जारी; लगेच या लिंकवरून करा डाउनलोड

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सेंट्रल झोनचे प्रादेशिक संचालक राहुल सचान यांनी सांगितले की, या झोनसाठी प्रवेशपत्र (एसएससी हेड कॉन्स्टेबल अॅडमिट कार्ड 2022) परीक्षेच्या 4 दिवस आधी जारी केले जाईल. तसेच, उमेदवारांच्या अर्जाची स्थिती एसएससीच्या अधिकृत वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे. याशिवाय दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षेत एकूण 31, 147 उमेदवार बसू शकतात.

SSC 21 ऑक्टोबर रोजी या झोनसाठी दिल्ली पोलिस कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) साठी ऑनलाइन परीक्षा आयोजित करेल. ही परीक्षाही एका दिवशी तीन शिफ्टमध्ये घेतली जाईल.

Success Story: तब्बल 1 कोटींचं पॅकेज नाकारून तिनं सुरु केला स्वतःचा बिझनेस; आज आहे 80,000 कोटींची उलाढाल

पहिली शिफ्ट सकाळी 9 ते 10:30, दुसरी 12:30 ते 2 आणि तिसरी दुपारी 4 ते 5:30 पर्यंत असेल. ज्या उमेदवारांनी अद्याप त्यांचे प्रवेशपत्र (दिल्ली पोलीस प्रवेशपत्र २०२२) डाउनलोड केलेले नाही ते एसएससीच्या प्रादेशिक वेबसाइटला भेट देऊन ते डाउनलोड करू शकतात.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert