मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Maharashtra HSC Result 2021: बारावी बोर्डाचा निकाल कुठे बघायचा, कसा डाउनलोड करायचा?

Maharashtra HSC Result 2021: बारावी बोर्डाचा निकाल कुठे बघायचा, कसा डाउनलोड करायचा?

Maharashtra 12th result 2021: महाराष्ट्र बोर्डाचे बारावीचे निकाल (MSBSHSE HSC result) दुपारी 4 वाजता जाहीर होतील. कुठे पाहाल कसा मिळवाल Result?

Maharashtra 12th result 2021: महाराष्ट्र बोर्डाचे बारावीचे निकाल (MSBSHSE HSC result) दुपारी 4 वाजता जाहीर होतील. कुठे पाहाल कसा मिळवाल Result?

Maharashtra 12th result 2021: महाराष्ट्र बोर्डाचे बारावीचे निकाल (MSBSHSE HSC result) दुपारी 4 वाजता जाहीर होतील. कुठे पाहाल कसा मिळवाल Result?

  पुणे, 3 ऑगस्ट: महाराष्ट्र शालेय शिक्षण मंडळाचा बारावीचा म्हणजेच (MSBSHSE HSC Result 2021) HSC चा निकाल दुपारी 4 वाजता जाहीर होणार आहे. या वर्षी कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावामुळे बोर्डाने नेहमीप्रमाणे लेखी परीक्षा घेतलेली नाही. आता अंतर्गत गुण आणि मूल्यांकनाच्या ठरलेल्या फॉर्म्युल्याने निकाल लावण्यात आलेला आहे. हा निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर दुपारी 4 नंतर खुला होईल. त्याबरोबरच lokmat.news18.com या आमच्या वेबसाइटवही तुम्ही बारावीचा निकाल पाहू शकता.

  कसा बघायचा Result?

  बोर्डाने mh-hsc.ac.in या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांचे रोल नंबर आणि सीट नंबर जारी केले आहेत. (Maharashtra HSC Results 2021) कोरोनामुळे बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे देण्यात आली नाहीत. आता विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी, बोर्डाने HSC रोल नंबर / सीट नंबर तपासण्यासाठी लिंक अॅक्टिव्ह केली आहे.

  news18lokmat च्या वेबसाइटवरही दुपारी 4 नंतर निकाल दिसतील.

  मूल्यांकन पद्धत

  दहावीप्रमाणे बारावीचा निकालही विशेष मूल्यांकन पद्धतीनं (Special Assessment system) लावण्यात येणार आहे. 40:30:30 या फॉर्म्युल्यानुसार निकाल लावण्यात येणार आहे. यात विद्यार्थ्यांच्या दहावी आणि अकरावीच्या मार्कांना प्रत्त्येकी 30 टक्के वेटेज आहे. तसंच बारावीच्या वर्षांतील अंतर्गत परीक्षा, असायमेन्टस यांना 40 टक्के वेटेज असणार आहे. यावरून विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे.

  विद्यार्थ्यांनो, पॉलिटेक्निक की बारावी? कोणता आहे तुमच्या फायद्याचा पर्याय; वाचा

  उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12 वी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट ) घेता येईल. अधिकृत संकेतस्थळांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

  1. https://hscresult.11 thadmission.org.in

  2. https://msbshse.co.in

  3. hscresult.mkcl.org

  4. mahresult.nic.in. .

  5. https://lokmat.news18.com

  6. www.mahresult.nic.in व https://msbshse.co.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाशिवाय इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

  तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

  First published:

  Tags: Board Exam, HSC