मुंबई, 25 मे: महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा बारावी परीक्षेचा निकाल आज म्हणजेच 25 मे 2023 ला जाहीर होणार आहे. दुपारी दोन वाजता हा निकाल जाहीर होणार आहे. ऑनलाईन पद्धतीनं हा निकाल विद्यार्थ्यांना बघता येणार आहे. यंदाचा निकाल नक्की कसा असेल? किती टक्केवारी असेल? आपला किंवा आपल्या पाल्यांना नक्की किती टक्के मिळतील असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडले आहेत. पण त्या आधी गेल्या वर्षीचा निकाल नक्की कसा होता? आणि यंदा देण्यात आलेल्या अतिरिक्त 10 मिनिटांचा विद्यार्थ्यांना फायदा होणार का? हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. कसा होता गेल्या वर्षीचा निकाल गेल्या वर्षी म्हणजेच 2022 साली बारावी बोर्डाचा एकूण निकाल हा 94.22 टक्के लागला होता. कोरोनानंतर पहिल्यांदाच ऑफलाईन परीक्षा गेल्या वर्षी घेण्यात आली होती. गेल्या वर्षी विज्ञान शाखेचा राज्याचा 98.30 टक्के इतका बंपर निकाल लागला होता. कला शाखेचा राज्याचा निकाल 90.51 टक्के इतका निकाल लागला होता. तर वाणिज्य विभागाचा निकाल 91.71 टक्के लागला होता. एकूण 153 विषयांपैकी 24 विषयांचा निकाल 100 टक्के इतका लागला होता.
कोणत्या विभागाचा किती टक्के होता निकाल पुणे: 93.61% नागपुर: 96.52% औरंगाबाद: 94.97% मुंबई: 90.91% कोल्हापूर: 95.07% अमरावती: 96.34 % नाशिक: 95.03% लातूर: 95.25% कोकण: 97.21% Maharashtra Board 12th Result: धक-धक वाढली; अवघ्या काही तासांमध्ये 12वीचा निकाल; या Links आताच करा सेव्ह त्या अतिरिक्त 10 मिनिटांचा फायदा होणार? यंदाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना पेपरमध्ये अतिरिक्त 10 मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. त्यामुळे त्यांना पेपरआधी प्रश्नपत्रिका वाचण्याचा वेळ न देता अतिरिक्त वेळ देण्यात आला होता. या वेळेचा अनेक विद्यार्थ्यांना फायदा होणार हे निश्चित आहे. काही प्रश्न राहून गेले असतील तर सोडवण्यात त्याचा फायदा होऊ शकेल. मात्र आता या वेळेचा फायदा किती विद्यार्थ्यांनी उचलला आहे हे बघणं महत्वाचं असेल.

)







