मराठी बातम्या /बातम्या /करिअर /आरोग्य विभागाच्या परीक्षेचा पुन्हा सावळागोंधळ; एकाच दिवशी दोन जिल्ह्यांत पेपर

आरोग्य विभागाच्या परीक्षेचा पुन्हा सावळागोंधळ; एकाच दिवशी दोन जिल्ह्यांत पेपर

आरोग्य विभागाच्या परीक्षांचा सावळागोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आरोग्य विभागातील परीक्षांसाठीचे हॉलतिकीट आणि केंद्र निवडीचा मुद्दा उपस्थित झाला आहे.

आरोग्य विभागाच्या परीक्षांचा सावळागोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आरोग्य विभागातील परीक्षांसाठीचे हॉलतिकीट आणि केंद्र निवडीचा मुद्दा उपस्थित झाला आहे.

आरोग्य विभागाच्या परीक्षांचा सावळागोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आरोग्य विभागातील परीक्षांसाठीचे हॉलतिकीट आणि केंद्र निवडीचा मुद्दा उपस्थित झाला आहे.

मुंबई, 16 ऑक्टोबर: काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागाकडून (Maharashtra Health Department Exam) घेण्यात येणारी परीक्षा ऐन परीक्षेच्या आदल्या दिवशी रद्द करण्यात आली होती. यामुळे राज्यभरात अनेक विद्यार्थ्यांनी आरोग्य विभागाच्या ओंगळ कारभाराविरोधात संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या. परीक्षेच्या आदल्यादिवशीच अचानक परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होते. यानंतर पुन्हा एकदा आरोग्य विभागाच्या परीक्षांचा सावळागोंधळ चव्हाट्यावर आला आहे. आरोग्य विभागातील परीक्षांमध्ये हॉलतिकीट आणि केंद्र निवडीचा मुद्दा उपस्थित झाला आहे.

खरंतर, आरोग्य विभागाने 24 ऑक्टोबर रोजी एकाच दिवशी दोन सत्रात पेपरचं आयोजन केलं आहे. त्यामुळे एका परीक्षा केंद्रात दोन्ही पेपर होणं अपेक्षित होतं. असं असताना उमेदवारांना सकाळी एका जिल्ह्यात परीक्षा केंद्र देण्यात आलं आहे. तर दुपारी दुसऱ्या जिल्ह्यात केंद्र देण्यात आलं आहे. यामुळे उमेदवारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याशिवाय काही पदांसाठी उमेदवारांनी परीक्षा फी भरली नसताना देखील त्यांना हॉल तिकीट प्राप्त झालं आहे. परीक्षा घेण्याचा कोणताही अनुभव नसताना, न्यासा कंपनीकडून या परीक्षा आयोजित केल्याने हा खोळंबा झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा-टॅलेंटच्या शोधात आयटी कंपन्या! 1 लाखांपेक्षा अधिक जणांना देणार नोकऱ्या

खरंतर, काही दिवसांपूर्वी आरोग्य मंत्र्यांनी स्वत: जाहीर केलं होतं की, काळ्या यादीत समाविष्ट असणाऱ्या न्यासा कंपनीला परीक्षा घेण्याचा अनुभव नाही. ही कंपनी मोठ्या स्तरावर परीक्षा घेण्यास सक्षम नसल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. असं असूनही याच कंपनीद्वारे परीक्षा का घेण्यात आल्या? असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे. उमेदवारांना परीक्षा केंद्र निवडण्याचा मूलभूत अधिकार असताना, कंपनीने दूरचं परीक्षा केंद्र दिलं आहे. कंपनीने विद्यार्थ्याच्या परस्पर परीक्षा केंद्र बदलले आहेत.

हेही वाचा-CBSE EXAMS: दहावी आणि बारावीची परीक्षा होणार ऑफलाईन, चार दिवसांनी जाहीर होणार वे

अनेक विद्यार्थ्यांचा फॉर्म भरलेला जिल्हा आणि परीक्षा केंद्राचा जिल्हा वेगवेगळा आहे. यामुळे विदर्भातील मुलांना पश्चिम महाराष्ट्रात आणि पश्चिम महाराष्ट्रातील मुलांना विदर्भात परीक्षा केंद्र देण्यात आलं आहे. तसेच अजून बऱ्याच विद्यार्थ्यांना हॉलतिकीट डाउनलोड करण्यास अनेक अडचणी येत आहेत. यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून आरोपी विभागाच्या ओंगळ कारभारावर ताशेरे ओढले जात आहेत.

First published:
top videos

    Tags: Career, महाराष्ट्र