मराठी बातम्या /बातम्या /करिअर /CBSE EXAMS: दहावी आणि बारावीची परीक्षा होणार ऑफलाईन, चार दिवसांनी जाहीर होणार वेळापत्रक

CBSE EXAMS: दहावी आणि बारावीची परीक्षा होणार ऑफलाईन, चार दिवसांनी जाहीर होणार वेळापत्रक

सीबीएसई बोर्डाकडून दहावी आणि बारावीची (CBSE tenth and twelfth exams timetable to be declared soon) प्रथम सत्र अर्थात सहामाही परीक्षा घेण्याची घोषणा करण्यात आली आहे.

सीबीएसई बोर्डाकडून दहावी आणि बारावीची (CBSE tenth and twelfth exams timetable to be declared soon) प्रथम सत्र अर्थात सहामाही परीक्षा घेण्याची घोषणा करण्यात आली आहे.

सीबीएसई बोर्डाकडून दहावी आणि बारावीची (CBSE tenth and twelfth exams timetable to be declared soon) प्रथम सत्र अर्थात सहामाही परीक्षा घेण्याची घोषणा करण्यात आली आहे.

नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर:  सीबीएसई बोर्डाकडून दहावी आणि बारावीची (CBSE tenth and twelfth exams timetable to be declared soon) प्रथम सत्र अर्थात सहामाही परीक्षा घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. येत्या 18 तारखेला परीक्षेचं (Time table to be declared on 18 october) वेळापत्रक जाहीर केलं जाईल, अशी माहिती बोर्डाच्या वतीनं जाहीर करण्यात आली आहे. दहावी आणि बारावीच्या (First term exams of 10th and 12th) विद्यार्थ्यांना यामुळे परीक्षेचे संकेत मिळाले असून अभ्यासाला लागण्याच्या सूचना शाळांनी दिल्या आहेत.

असे असेल नियोजन

दहावी आणि बारावीच्या सहामाही परीक्षा येत्या नोव्हेंबर आणि डियासेंबर महिन्यात घेणार येणार आहेत. या परीक्षा ऑफलाईन असणार आहेत. पहिल्या सत्रात नियोजित अभ्यासक्रमावर आधारित या परीक्षा घेण्यात येणार असून त्याचं वेळापत्रक 18 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येईल, असं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. बहुपर्यायी प्रश्नांच्या स्वरुपात (Multiple  choice questions) ही परीक्षा घेतली जाणार असून वर्षातील निम्मा अभ्यासक्रम त्यासाठी असेल, अशी माहिती देण्यात आली आहे.

हे वाचा- Sony Off Campus Drive: Sony कंपनीमध्ये फ्रेशर्ससाठी ऑफ कॅंपस ड्राइव्ह; करा

इथे पाहा वेळापत्रक

दहावी आणि बारावीच्या सहामाही परीक्षेचं वेळापत्रक cbse.nic.in किंवा cbseacademic.nic.in या संकेतस्थळांवर पाहता येणार आहे. 18 ऑक्टोबरनंतर हे वेळापत्रक या संकेतस्थळांवर अपलोड केलं जाईल. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाऊन ही परीक्षा द्यावी लागणार असून प्रत्येक पेपरसाठी 90 मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे मुद्दे

-    सीबीएसई बोर्डाची दहावी आणि बारावीची परीक्षा

-    18 ऑक्टोबरला वेळापत्रक होणार जाहीर

-    परीक्षा होणार ऑफलाईन

-    वर्षातील निम्मा अभ्यासक्रम परीक्षेला असणार

-    MCQ म्हणजेच बहुपर्यायी प्रश्नांच्या आधारे ही परीक्षा घेतली जाणार

-    18 ऑक्टोबरनंतर संकेतस्थळावर परीक्षेचं वेळापत्रक उपलब्ध होणार

-    प्रत्येक पेपरसाठी 90 मिनिटांचा अवधी असणार

First published:

Tags: CBSE, Education, Exam