मुंबई, 17 जानेवारी : एकीकडे कोरोनामुळे लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या असताना रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Railtel Corporation of India) विविध पदांसाठी भरती करते आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार Railtelindia.com या वेबसाइटवर अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2022 ही आहे. संस्थेतल्या 69 रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल. त्यात 150 मार्कांचे MCQ असतील.
या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची इंटरव्ह्यूसाठी निवड होईल. त्यासाठी 50 मार्क्स असतील. या पदांवर रुजू होण्यासाठी उमेदवाराला ऑनलाइन आणि प्रत्यक्ष मुलाखतीत 60% मार्क मिळवावे लागतील. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन तपशीलवार माहिती घ्यावी. निवड झालेल्या उमेदवारांना शैक्षणिक प्रमाणपत्रं, जातीचं प्रमाणपत्र इत्यादी आवश्यकतेनुसार योग्य ती कागदपत्रं जमा करावी लागतील. प्रत्येक पदासाठी पात्रतेचे निकष वेगवेगळे आहेत; त्यामुळे अर्ज रिजेक्ट होऊ नये, यासाठी आधी पात्रता निकष बघून मगच अर्ज भरावा. विविध पदांच्या पात्रतेबद्दलची माहिती Railtelindia.com या वेबसाइटवर दिली आहे.
लक्षात ठेवा! Resume मधील 'या' लहान चुकाही पडू शकतात महागात; असा बनवा Resume
रिक्त पदांची माहिती
डेप्युटी मॅनेजर - 52 जागा
मॅनेजर - 10 जागा
सीनिअर मॅनेजर - 7 जागा
एक उमेदवार प्रत्येक गटातल्या जास्तीत जास्त एकाच जागेसाठी अर्ज भरू शकतो. उमेदवाराला दोन्ही गटांमधल्या जागेसाठी अर्ज भरायचा असेल तर त्याला दोन वेळा अर्ज भरावा लागेल. तसंच फीदेखील दोन वेळा भरावी लागेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसंच गट 1 आणि गट 2 च्या परीक्षा वेगळ्या असणार आहेत, याचीही नोंद घ्यावी.
Bank Exam Tips: आता एका Attempt मध्ये क्रॅक होईल बँक PO परीक्षा; वाचा टिप्स
अर्ज करण्याची पद्धत
Railtelindia.com या वेबसाइटवर जाऊन करिअर टॅब उघडावी. त्यानंतर 'करंट जॉब ओपनिंग'वर क्लिक करावं. तिथल्या विविध विभागांमध्ये भरतीसाठी दिलेल्या अर्जावर क्लिक करावं. तिथल्या प्रश्नांची उत्तरं देऊन नोंदणी करावी. त्यानंतर आपले क्रेडेंशिअल्स वापरून लॉगइन करावं.
लॉगइन केल्यावर एक अर्ज दिसेल. तो अर्ज भरून, तिथे नमूद केलेली डॉक्युमेंट्स अपलोड करावीत. अर्जाची फी भरून अर्ज जमा करावा. भरलेल्या अर्जाची एक प्रिंट आपल्याकडे काढून ठेवावी.
उमेदवारांना 1200 रुपये फी म्हणून भरावी लागेल. आरक्षित श्रेणीतल्या उमेदवारांसाठी अर्जाची किंमत 600 रुपये आहे. ही फी ऑनलाईन पेमेंट गेटवेच्या माध्यमातून भरावी लागेल. यासाठी लागणारे बँकेचे चार्जेसदेखील उमेदवारांनाच भरावे लागतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.