• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • Government Jobs: महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ इथे विविध पदांसाठी भरती; अर्ज करण्याची उद्याची शेवटची तारीख

Government Jobs: महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ इथे विविध पदांसाठी भरती; अर्ज करण्याची उद्याची शेवटची तारीख

यासाठी दिलेल्या पत्त्यावर किंवा ई-मेल आयडीवर ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची उद्या शेवटची तारीख असणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 20 नोव्हेंबर: महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ (Maharashtra Information Technology Corporation Ltd) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Maha IT Corporation Ltd Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. वित्त आणि लेखा व्यवस्थापक, लेखाधिकारी, वित्त कार्यालय, लेखापरीक्षा अधिकारी, वित्त कार्यकारी या पदांसाठी ही भरती (Maharashtra Government Jobs) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर किंवा ई-मेल आयडीवर ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या जागांसाठी भरती वित्त आणि लेखा व्यवस्थापक (Finance and Accounts Manager) लेखाधिकारी (Accounts Officer) वित्त कार्यालय (Finance Office) लेखापरीक्षा अधिकारी (Audit Officer) वित्त कार्यकारी (Finance Executive) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वित्त आणि लेखा व्यवस्थापक (Finance and Accounts Manager) - CA पर्यंत शिक्षण आवश्यक तसंच दहा वर्षांचा अनुभव आवश्यक. लेखाधिकारी (Accounts Officer) - : B.Com, CA Inter पर्यंत शिक्षण आवश्यक तसंच तीन ते पाच वर्षांचा अनुभव आवश्यक. वित्त अधिकारी (Finance Officer) - B.Com, CA Inter पर्यंत शिक्षण आवश्यक तसंच तीन ते पाच वर्षांचा अनुभव आवश्यक. लेखापरीक्षा अधिकारी (Audit Officer) - B.Com, CA Inter पर्यंत शिक्षण आवश्यक तसंच तीन ते पाच वर्षांचा अनुभव आवश्यक. वित्त कार्यकारी (Finance Executive) - B.Com, M.Com पर्यंत शिक्षण आवश्यक तसंच एक ते पाच वर्षांचा अनुभव आवश्यक. इतका मिळणार पगार वित्त आणि लेखा व्यवस्थापक (Finance and Accounts Manager) - 80,000/- रुपये प्रतिमहिना लेखाधिकारी (Accounts Officer) - 40,000/- - 60,000/- रुपये प्रतिमहिना वित्त अधिकारी (Finance Officer) - 40,000/- - 60,000/- रुपये प्रतिमहिना लेखापरीक्षा अधिकारी (Audit Officer) - 40,000/- - 60,000/- रुपये प्रतिमहिना वित्त कार्यकारी (Finance Executive) - 12,000/- -.18,000/- रुपये प्रतिमहिना '10 लाख नोकऱ्यांना देतोय सपोर्ट', भारतातील गुंतवणुकीबाबत Apple चं मोठं वक्तव्य ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज कारण्यासाठी पत्ता/ई-मेल आयडी मॅनेजिंग डायरेक्टर, महाराष्ट्रा इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेड (महाराष्ट्र सरकार एंटरप्राइज) तिसरा मजला, अपीजय हाऊस, के.सी.कोलेजजवळ, चर्चगेट, मुंबई – 400020 / hr1.mahait@mahait.org अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 नोव्हेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mahait.org/या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: