Home /News /lifestyle /

Vastu Tips: पालकांनो, मुलांचं अभ्यासात लक्ष नाहीये? मग त्यांच्या खोलीतून आताच बाहेर काढा 'या' गोष्टी

Vastu Tips: पालकांनो, मुलांचं अभ्यासात लक्ष नाहीये? मग त्यांच्या खोलीतून आताच बाहेर काढा 'या' गोष्टी

घरात कुठे काय ठेवायचं, कुठे काय ठेवू नये

घरात कुठे काय ठेवायचं, कुठे काय ठेवू नये

स्टडी रूम अर्थात अभ्यास (Vastu Tips for study room) करण्याच्या खोलीत काय असावं, काय असू नये याबद्दलची माहिती पाहूया

    मुंबई, 22 फेब्रुवारी: आपलं, स्वतःचं घर (Home) हे माणसाचं सर्वांत हक्काचं ठिकाण असतं. या ठिकाणी माणूस सर्वांत आनंदी असतो. घरात माणसाला आणखी आनंदी राहायचं असेल, तर वास्तुशास्त्र उपयुक्त ठरतं, असं त्या विषयातले तज्ज्ञ म्हणतात. वास्तुशास्त्राचा विचार करून घर बांधलं असेल, तर मनःशांती मिळते. तसंच सुख-समृद्धीही प्राप्त होते. तसंच, वास्तुशास्त्रात केवळ घर बांधण्याचाच नव्हे, तर घरात कुठे काय ठेवायचं, कुठे काय ठेवू नये, याचाही विचार केलेला आहे. स्टडी रूम अर्थात अभ्यास (Vastu Tips for study room) करण्याच्या खोलीत काय असावं, काय असू नये, याबद्दलची माहिती 'आज तक'ने प्रसिद्ध केली आहे. याबद्दलची माहिती पाहू या. अभ्यास करण्यासाठी लक्ष एकाग्र होण्याची नितांत आवश्यकता असते. एकाग्रतेशिवाय अभ्यास (Study) चांगला होत नाही आणि केलेला अभ्यास लक्षातही राहत नाही. म्हणूनच प्रत्येक घरात शांतता असेल अशा ठिकाणीच अभ्यासाची खोली असते. वास्तुशास्त्र असं सांगतं, की स्टडी टेबलवर काही ठरावीक वस्तू असल्या, तर अभ्यास करताना मन लागत नाही. असंही होऊ शकतं, की भरपूर अभ्यास करूनही परीक्षेत चांगलं यश मिळण्याची शक्यता कमी होते. म्हणूनच त्या गोष्टी कोणत्या हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून त्या वस्तू दूर ठेवता येतील. विद्यार्थ्यांनो, टेन्शन नही लेनेका! परीक्षांमुळे येणारा ताण असा होईल दूर कात्री आणि सुई या वस्तू स्टडी टेबलवर असू नयेत, असा संकेत आहे. अभ्यासाच्या खोलीत किंवा टेबलवर आरसा असू नये. इलेक्ट्रॉनिक वस्तू, व्हिडिओ गेम्स, चित्रपटांची पोस्टर्सदेखील अभ्यासाच्या खोलीत किंवा स्टडी टेबलवर (Study Table) असू नयेत. त्यामुळे लक्ष विचलित होतं. मन एकाग्र होत नाही. रोजचा, ताजा पेपर अभ्यासासाठी आवश्यक असला, तरी जुन्या पेपर्सची रद्दी अभ्यासाच्या खोलीत असू नये. अभ्यासाच्या खोलीत बसून खाऊ नये. तसंच अभ्यास करतानाही खाऊ नये. या खोलीत कॉफीही असू नये. अभ्यासाशी संबंध नसलेली पुस्तकंही अभ्यासाच्या खोलीत असू नयेत. अँटिक मूर्ती, आक्रमक/हिंसक फोटोज अशा वस्तूही अभ्यासाच्या खोलीत असल्यास मन एकाग्र होत नाही. त्याचा साहजिकच अभ्यासावर विपरीत परिणाम होतो. वास्तुशास्त्र असं सांगतं, की अभ्यासाच्या खोलीत हिरव्या पोपटाचं चित्र जरूर लावावं. त्या चित्रामुळे मुलांचं लक्ष अभ्यासावर केंद्रित व्हायला मदत होते. अभ्यासाच्या खोलीचा अर्थात Study Room च्या भिंतींना पांढरा, Pinkish किंवा क्रीम कलर द्यावा. स्टडी रूम स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकी ठेवावी. त्याचा अभ्यासावर चांगला परिणाम होतो. पालकांनो, कोरोनामुळे वाजले शिक्षणाचे बारा; तुमच्या मुलांनाही 'हे' प्रॉब्लेम येत नाहीत ना? जाणून घ्या घराच्या पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे स्टडी रूम असावी, असं वास्तुशास्त्रात सांगितलं आहे. स्टडी रूमच्या ईशान्य कोपऱ्यात काहीही ठेवू नये. हा कोपरा रिकामा ठेवावा. स्टडी रूमच्या दक्षिण किंवा पश्चिमेकडच्या भिंतीला टेकवून स्टडी टेबलची खुर्ची ठेवावी, जेणेकरून अभ्यास करणाऱ्या मुलाचं किंवा मुलीचं तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला राहील. अभ्यास करताना घराच्या उत्तरेकडे तोंड असेल, तर आणखीच चांगलं. स्टडी रूममध्ये सरस्वती देवीचं चित्र लावावं किंवा महर्षी वेदव्यास, तथा अन्य महापुरुषांची चित्रं लावली तरी चालू शकेल.
    First published:

    Tags: Career, Exam, Lifestyle, Tips

    पुढील बातम्या