Home /News /career /

उद्या बारावीचे निकाल : COVID मुळे पुनर्मूल्यांकन आणि गुणपडताळणी होणार ऑनलाईन, असा करा अर्ज

उद्या बारावीचे निकाल : COVID मुळे पुनर्मूल्यांकन आणि गुणपडताळणी होणार ऑनलाईन, असा करा अर्ज

महाराष्ट्राच्या HSC बोर्डाचे निकाल उद्या म्हणजे 16 जुलैला दुपारी एक वाजता लागणार आहेत. हे निकाल बोर्डाच्या अधिकृत संकेस्थळावर mahresult.nic.in दुपारी 1 वाजता जाहीर होतील.

    पुणे, 15 जुलै : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीचे HSC (Maharashtra Board class XII result) बोर्डाचे निकाल उद्या म्हणजे 16 जुलैला दुपारी एक वाजता लागणार आहेत. हे निकाल बोर्डाच्या अधिकृत संकेस्थळावर दुपारी जाहीर होतील.mahresult.nic.in किंवा mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाईटवर निकाल जाहीर झाल्यानंतर News18lokmat.com च्या वेबसाईटवरही ते पाहता येतील. अपेक्षेएवढे गुण मिळाले नाहीत तर विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिकांची गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकन करता येतं. यासाठी दरवर्षी विद्यार्थी बोर्डाच्या कार्यालयात धाव घेतात. पण सध्या लॉकडाऊनमुळे आणि Coronavirus चा धोका असल्याने ही प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन होईल, असं बोर्डाने कळवलं आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा महाराष्ट्र बोर्डाचे निकाल news18lokmat च्या वेबसाईटवर पाहता येतील. विद्यार्थ्यांनी त्यांचा परीक्षा क्रमांक आणि इतर डिटेल्स टाकल्यावर त्यांना निकाल पाहता येईल.
    Rechecking and Revaluation म्हणजे गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकन प्रक्रिया 17 तारखेपासून 27 जुलैपर्यंत ऑनलाईन असेल. या काळात कुणा विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणाविषयी शंका असेल तर त्यांनी ऑनलाईन अर्ज करावा. या प्रक्रियेसाठीचं शुल्कसुद्धा ऑनलाईनच भरावं लागणार आहे. उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीकरता (Photo copy) 17 जुलै ते 5 ऑगस्ट दरम्यान online अर्ज करता येईल. पुनर्मूल्यांकनासाठी छायाप्रत म्हणजे फोटो क़पी आवश्यक आहे. छायाप्रत मिळाल्यानंतर 5 दिवसांत पुनर्मूर्ल्यांकन प्रक्रिया होईल. यासाठीचं शुल्कही online भरायचं आहे या तारखा आहेत महत्त्वाच्या 16 जुलै - 12 वी निकाल जाहीर 17 जुलै ते 27जुलै - ऑनलाईन गुणपडताळणी 17 जुलै ते 5 ऑगस्ट - छायाप्रत आणि पुनर्मूल्यांकनाची ऑनलाईन प्रक्रिया
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    पुढील बातम्या