मुंबई, 19 जुलै: राज्याच्या शालेय शिक्षण मंडळाकडून काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे न झालेल्या ऐतिहासिक अशा दहावीच्या परीक्षेचा निकाल (Maharashtra SSC result 2021) जाहीर करण्यात आला. मात्र आता दहावीनंतर बारावीच्या निकालाकडे (Maharashtra 12th result date) सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्याच्या शिक्षण मंडळानं दिलेल्या माहितीनुसार जुलै महिन्यातच बारावीचा निकाल (MH HSC result 2021) जाहीर होणार आहे. मात्र आता बारावीचा निकाल येत्या काही दिवसातच लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्याचा बारावीचा निकाल (MH HSC result 2021 date) येत्या 21 जुलैला लागण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे (Corona) दहावी आणि बारावीच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे बारावीचा निकाल उशिरा लागत आहे. बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. मात्र अखेर बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हे वाचा - विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या सतीश मेनन यांच्याकडे क्लाससाठी नव्हते पैसे; तरीही पास दहावीप्रमाणे बारावीचा निकालही विशेष मूल्यांकन पद्धतीनं (Special Assessment system) लावण्यात येणार आहे. 40:30:30 या फॉर्म्युल्यानुसार निकाल लावण्यात येणार आहे. यात विद्यार्थ्यांच्या दहावी आणि अकरावीच्या मार्कांना प्रत्त्येकी 30 टक्के वेटेज आहे. तसंच बारावीच्या वर्षांतील अंतर्गत परीक्षा, असायमेन्टस यांना 40 टक्के वेटेज असणार आहे. यावरून विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे. दहावीच्या निकालादरम्यान विद्यार्थ्यांना निकाल बघण्यास झालेली अडचण बघता बारावीच्या निकालाच्या दिवशी अशी अडचण विद्यार्थ्यांना येणार नाही असा प्रयत्न राज्य सरकारचा असणार आहे. बारावीच्या निकालाबाबत शिक्षण मंडळाकडून अजूनही अधिकृत तारखेची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र येत्या काही दिवसातच बारावीचा निकाल जाहीर करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.