मुंबई, 31 ऑगस्ट: जॉब शोधणाऱ्यांसाठी किंवा नोकरी करत असलेल्या प्रोफेशनल्ससाठी LinkedIn हे सर्वात उपयोगी प्लॅटफॉर्म आहे. या जॉब सर्च प्लॅटफॉर्ममुळे अनेकांना जॉब मिळाले आहेत तर अनेक जण यावर जॉब करिअर करू इच्छित आहेत. मात्र याच LinkedIn वर तुमच्यसोबत फसवणूक झाली तर? हो हे शक्य आहे. काही हॅकर्स तुमच्या LinkedIn अकाउंटवर डोळा ठेऊन आहेत. यामुळे तुमचं बँक अकाउंटही रिकामं होऊ शकतं. म्हणूनच हा स्कॅम यापासून तुम्ही सावध शकता हे आज आम्ही सांगणार आहोत. Personality Development: ऑफिसमधील प्रत्येकजण होईल आता तुमचा फॅन; अशी पर्सनॅलिटी असणं IMP अनेकदा तुम्हाला काही अनोळखी लोकांच्या रिक्वेस्ट येतात. त्या मोठ्या कंपन्यांच्या नावाने येतात म्हणून आपण त्या आपण स्वीकारतो आणि इथेच आपण चुकतो. यामुळे आपलं अकाउंट धोक्यात येऊ शकतं. यासाठी आपल्याला आधी रिक्वेस्ट सेंड केली जाऊ शकते. ती आपण स्वीकारली की तुमच्या मोबाईलमध्ये मालवेअर जाऊ शकतो. हा मालवेअर तुमच्या मोबाईलचा डेटा आणि तुमच्या बँक अकाउंट संबंधीची संपूर्ण माहिती हॅकर्सना मिळू शकतो. त्यामुळे तुमचं संपूर्ण अकाउंट हॅक होऊ शकतं. तसंच तुमचा पर्सनल डेटा त्या हॅकर्सपर्यंत जाऊ शकतो. सणासुदीच्या काळात अभ्यासाकडे दुर्लक्ष होतंय? चिंता नको; असं दोन्ही होईल मॅनेज कसं राहावं सुरक्षित यासाठी सर्वात मोठी टीप म्हणजे अशा कोणत्याही रिक्वेस्ट स्वीकारू नका ज्या तुम्हाला अनोळखी असतील. यामुळे तुम्ही स्कॅमपासून वाचू शकता. तसंच LinkedIn वर आलेली कोणतीही अनोळखी लिंक ओपन करू नका. यामुळे तुमच्या मोबाईलमध्ये मालवेअर जाणार नाही. तसंच कोणतीही रिक्वेस्ट स्वीकारताना ती तुमच्या कॉन्टॅक्टमधील आहे का हे चेक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.