जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Personality Development: ऑफिसमधील प्रत्येकजण होईल आता तुमचा फॅन; अशी पर्सनॅलिटी असणं IMP

Personality Development: ऑफिसमधील प्रत्येकजण होईल आता तुमचा फॅन; अशी पर्सनॅलिटी असणं IMP

अशी पर्सनॅलिटी असणं IMP

अशी पर्सनॅलिटी असणं IMP

आज आम्ही तुम्हाला आज अशा काही टिप्स (Tips to improve Personality) देणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमची पर्सनॅलिटी चांगली ठेऊ शकाल. चला तर मग जाणून घेऊया.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 31 ऑगस्ट: सध्याच्या टेक्नॉलॉजीच्या आणि वेगवान काळात स्वतःला जगाच्या दोन पावलं पुढे ठेवण्याची इच्छा प्रत्येकाच्याच मनात असते. करिअर (Career Tips) मध्ये पुढे जाण्यासाठी अनेकजण निरनिराळे उपाय करतात. मात्र प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. काही जण प्रोफेशनल पद्धतीनं मेहनत (How to be professional) करून समोर जातात (How to be Successful) तर काही जण बॉसचं कौतुक करून पुढे जातात. मात्र करिअरच नाही तर जगातील तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही क्षेत्रात किंवा विषयामध्ये किंवा गोष्टीत यशस्वी (Instant Success Tips) व्हायचं असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट (Personality Development Tips). तुमची पर्सनॅलिटी चांगली असेल तर तुम्ही करिअरमध्ये उउंच शिखर गाठू शकता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आज अशा काही टिप्स (Tips to improve Personality) देणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमची पर्सनॅलिटी चांगली ठेऊ शकाल. चला तर मग जाणून घेऊया. कम्युनिकेशन स्किस्लकडे लक्ष द्या तुम्ही लोकांशी कसे बोलता त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात मोठा फरक पडतो. म्हणूनच तुम्ही कोणाशी कसे बोलता याची काळजी घेतली पाहिजे. लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही कोणाशी बोलत असता तेव्हा तुमचा आवाज नेहमी मऊ ठेवा आणि हळू किंवा वेगाने बोलू नका. काहीही बोलण्यापूर्वी विचार करा की समोरच्या व्यक्तीला तुम्ही जे बोलले त्याचे वाईट तर वाटणार नाही ना. जेंव्हा बोलता तेंव्हा समोरच्या व्यक्तीकडे पाहूनच बोला. यामुळे तुमच्यातील कम्युनिकेशन स्किल्स लोकांना दिसतील आणि तुमची Personality लोकांना पॉझिटिव्ह वाटेल. सणासुदीच्या काळात अभ्यासाकडे दुर्लक्ष होतंय? चिंता नको; असं दोन्ही होईल मॅनेज

बॉडी लँग्वेज सुधारा

सुरुवातीला तुमची बसण्याची पद्धत सुधारा. जेंव्हा तुम्ही कोणाच्या समोर बसाल तेंव्हा अशा प्रकारे बसा की समोरच्या व्यक्तीला बघून तुम्ही तुमच्या घरात बसला आहात असे वाटू नये. तुमची बसण्याची शैली व्यावसायिक ठेवा. चालतानाही लक्षात ठेवा की आरामात चाला आणि दुसऱ्याला ढकलताना चालू नका. तसेच, जेव्हाही तुम्ही कोणाच्या समोर उभे राहून बोलत असता तेव्हा अशा प्रकारे उभे राहू नका की तुमचा ओव्हर Attitude त्यांना दिसेल. ड्रेसिंग सेन्स चांगला ठेवा ड्रेसिंग सेन्स व्यक्तिमत्वात महत्त्वाची भूमिका बजावते, एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलत नसली तरीही ड्रेसिंग सेन्स पाहून तुमच्याबद्दल खूप काही सांगू शकते. म्हणून, लक्षात ठेवा की कोणत्याही मिटींग्स किंवा व्यावसायिक ठिकाणी, स्वच्छ कपडे घाला. तसेच जर तुम्ही पार्टीला जात असाल तर पार्टीचे कपडे घाला, फॉर्मल कपडे अजिबात घालू नका. यामुळे तुमची Personality चांगली दिसू शकते. मोठी खूशखबर! राज्यातील या कॉलेजमध्ये बंपर ओपनिंग्स; तुम्ही पात्र आहात? करा चेक

एक चांगला श्रोता व्हा

जे आपले ऐकतात त्यांना आपण नेहमी इतरांपेक्षा जास्त महत्त्व देतो. चांगला श्रोता असणं हे चांगल्या व्यक्तिमत्त्वाचं लक्षण आहे असं अनेक लोक मानतात. तुम्हालाही तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारायचे असेल तर लोकांचे ऐकणे सुरू करा आणि चांगले श्रोता बनण्याचा प्रयत्न करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात