मुंबई, 08 डिसेंबर: कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ शाळा, कॉलेजेस सुरु झाले आहेत. त्यामुळे परीक्षाही सुरु झाल्या आहेत. गेले कित्येक महिने ऑनलाईन शाळा (Online Education) आणि परीक्षा सुरु असल्यामुळे विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची सवय तुटली होती. मात्र आता परीक्षा ऑफलाईन असल्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यास (How to study well) करावा लागतोय. काही विद्यार्थ्यांना रात्रभर जागून (How to study at night) अभ्यास करायची सवय असते. मात्र अभ्यास करताना झोप (How to study at night without sleep) येते किंवा थकवा वाटतो अशी अनेक विद्यार्थ्यांची तक्रार असते. आता चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स (How to avoid sleep while studying) देणार आहोत ज्यामुळे तुम्हाला अभ्यास करताना झोप येणार नाही. चला तर मग जाणून घेउया.
रात्री थोडी झोप घ्या
रात्री उशिरापर्यंत जागी राहण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे शक्य असल्यास दुपारी थोडी झोप घेणे. जेणेकरून तुम्ही विचलित न होता रात्री अभ्यास करू शकता. जर तुम्ही दुपार पुरेशी झोप घेतली तर तुम्ही रात्री नव्या जोमानं अभ्यास करू शकता.
चहा किंवा कॉफी घ्या
जरा तुम्हाला रात्रभर जागून अभ्यास करायचा असेल तर चहा किंवा कॉफी घ्या. मात्र गरजेपेक्षा जास्त कॉफी किंवा चहा घेऊ नका. यामुळे तुमची प्रकृती खराब होऊ शकते. त्यामुळे गरज आले तितकाच चहा आणि कॉफी प्या.
स्वतःचे विचार आता इतरांपर्यंत पोहोचवा; सुरु करा Blogging; कमवा भरघोस पैसे
स्टडी लॅम्पमध्ये अभ्यास करू नका
जर तुम्ही रात्री फक्त स्टडी दिवा लावून अभ्यास करत असाल आणि बाकीच्या खोलीत अंधार असेल तर यामुळे तुम्हाला झोप येईल. शक्य असल्यास खोलीचा दिवा लावून अभ्यास करा. खोलीत चांगलाईट्स असतील तर आळसाचे वातावरण दूर होईल आणि अभ्यास करण्याची इच्छा होईल.
लेटून अभ्यास करू नका
बेडवर लेटून अभ्यास करू नका कारण असे केल्याने झोपेला आमंत्रण मिळते. त्यामुळे शक्य असल्यास खुर्ची-टेबलवर पाठ सरळ करूनच बसा. शक्य तितक्या कठीण विषयांचा अभयास करा म्हणजे तुम्हाला झोप येणार नाही.
काय सांगता! खोल पाण्यात मारा उडी आणि कमवा लाखो रुपये; कसे? इथे मिळेल माहिती
गणिताचा अभ्यास करा
रात्रभर जागून तुम्हाला तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर ज्या विषयांमध्ये गणित असेल अशा विषयांचा अभ्यास करा. यामध्ये तुमची बुद्धी चालेल आणि तुम्हाला झोप येणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.