मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

पत्रकारितेत करिअर करायचंय? कोर्सेसपासून कॉलेजपर्यंत इथे मिळेल संपूर्ण माहिती

पत्रकारितेत करिअर करायचंय? कोर्सेसपासून कॉलेजपर्यंत इथे मिळेल संपूर्ण माहिती

आज आम्ही तुम्हाला अशाच काही कोर्सेसबद्दल आणि कॉलेजेसबद्दल (Top journalism colleges)  माहिती देणार आहोत.

आज आम्ही तुम्हाला अशाच काही कोर्सेसबद्दल आणि कॉलेजेसबद्दल (Top journalism colleges) माहिती देणार आहोत.

आज आम्ही तुम्हाला अशाच काही कोर्सेसबद्दल आणि कॉलेजेसबद्दल (Top journalism colleges) माहिती देणार आहोत.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 20 जून : पत्रकारिता (Journalism) म्हंटल की पाळ्या डोळ्यासमोर येतात टीव्हीवर दिसणारे आणि बातम्या सांगणारे अँकर्स (TV Anchors) किंवा कठीण परिस्थितीतही अगदी खरी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणारे रिपोर्टर्स (Journalist reporters). लिखाणाची, कॅमेरा समोर जाण्याची किंवा एखादी घटना लोकांपर्यंत पोहोचवण्याची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना पत्रकारितेत करिअर (Career in journalism) करण्याची इच्छा असते. मात्र पत्रकारिता म्हणजे फक्त अँकरिंग आणि रिपोर्टींगच (Anchoring and Reporting) नाही. याउलट पत्रकारितेत अनेक प्रकारचे कोर्सेस (Courses in Journalism) आहेत ज्यामुळे तुमचं करिअर बनवता येईल. आज आम्ही तुम्हाला अशाच काही कोर्सेसबद्दल आणि कॉलेजेसबद्दल (Top journalism colleges)  माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

पत्रकारिता हे क्षेत्र जितकं वाटतं तितकं सोपं नक्कीच नाही. सामाजिक भान, सामाजिक बांधिलकी, ज्ञान आणि वेळेचं महत्त्वं असणं आवश्यक आहे. पत्रकारिता . करण्यासठी दहावी त्यानंतर बारावी आणि त्यानंतर मास कम्युनिकेशनमध्ये पदवी घेणं महत्वाचं आहे. किंवा तुम्ही पदवीनंतरही PG डिप्लोमा करू शकता.

हे वाचा - पॉवरग्रीडमधील या पदांसाठी करा आजच अप्लाय; पगार बघून व्हाल थक्क

हे आहेत पत्रकारितेतील काही कोर्स

बी.जे. (Bachelor of Journalism)

बीजेएमसी (Bachelor of Journalism and Mass Communication)

बीए - जेएमसी (Bachelor of Arts in Journalism and Mass Communication)

बीसीजे (Bachelor of Communication and Journalism)

बीएमएम (Bachelor of Mass Media)

बीजे (Bachelor of Journalism (Honours))

बीए (Bachelor of Arts in Mass Communication)

हे आहेत टॉप कॉलेजेस

कमला नेहरू कॉलेज फॉर वुमन, दिल्ली (Kamala Nehru College for Women, Delhi)

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जर्नलिझम अँड न्यू मीडिया, बेंगलुरू (Indian Institute of Journalism and New Media, Bengaluru)

लेडी श्री राम कॉलेज फॉर वुमन, दिल्ली (Lady Shri Ram College for Women, Delhi)

आयआयएमसी, नवी दिल्ली (IIMC, New Delhi)

झेविअर इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन, मुंबई (Xavier Institute of Communication, Mumbai)

फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे (Film and Television Institute of India, Pune)

First published:

Tags: Jobs