मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

इंजिनिअरिंग डिप्लोमा केलाय? मग पॉवरग्रीडमधील या पदांसाठी आजच करा अप्लाय; पगार बघून व्हाल थक्क

इंजिनिअरिंग डिप्लोमा केलाय? मग पॉवरग्रीडमधील या पदांसाठी आजच करा अप्लाय; पगार बघून व्हाल थक्क

ही भरती प्रक्रिया 1 June जूनपासून सुरू झाली असून ती  8 July जुलैपर्यंत सुरू राहणारआहे.

ही भरती प्रक्रिया 1 June जूनपासून सुरू झाली असून ती 8 July जुलैपर्यंत सुरू राहणारआहे.

ही भरती प्रक्रिया 1 June जूनपासून सुरू झाली असून ती 8 July जुलैपर्यंत सुरू राहणारआहे.

  • Published by:  Atharva Mahankal

नवी दिल्ली, 20 जून : पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने (Power grid Corporation of India Limited) (PGCIL) डिप्लोमा प्रशिक्षणार्थी भरतीसंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.PGCI 2021 मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड यासारख्या राज्यांतील संप्रेषण प्रणाली-II साठी केली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया 1 June जूनपासून सुरू झाली असून ती  8 July जुलैपर्यंत सुरू राहणारआहे. या पदावर निवड होण्यासाठी उमेदवारांना कम्प्युटर बेस टेस्ट द्यावी लागणार आहे. ही टेस्ट २ तासांची राहणार आहे. तसंच यात लेखी परीक्षा घेतली जाऊ शकते.

या आहेत जागा

यात एकूण 20 रिक्त जागा असून त्यातील 15 जागा डिप्लोमा ट्रेनी (Electrical) आणि उर्वरित 5 UG ट्रेनी (CIVIL) साठी आहेत. प्रशिक्षण कालावधीच्या वेळी उमेदवारास दरमहा 27,500 रुपयांचं वेतन मिळणार आहे.

हे वाचा - Private Sector मध्ये Jobs च्या शोधात आहात? या सरकारी पोर्टलवर मिळेल माहिती

ही शैक्षणिक पात्रता असणं आवश्यक

70% गुणांसह मान्यताप्राप्त संस्थेकडून अभियांत्रिकीच्या संबंधित शाखेत पूर्णवेळ नियमित तीन वर्षांचा डिप्लोमा असलेले उमेदवारच अर्ज करण्यास पात्र असतील. अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / अपंगत्व असलेले उमेदवार पास गुणांसह पदासाठी अर्ज करू शकतात.

अशी असेल परीक्षा

परीक्षेचा भाग -1 -- टेक्निकल टेस्ट आणि व्यावसायिक ज्ञान चाचणीवर आधारित असेल. यात संबंधित विषयातील 120 प्रश्न असतील. पेपरचा भाग २ -- एप्टीट्यूड टेस्ट असेल.

या वेबसाईटला द्या भेट

पॉवरग्रीड डिप्लोमा प्रशिक्षणार्थी भरती 2021 मध्ये इच्छुकांनी www.powergrid.in या संकेतस्थळावर अर्ज करावा.

First published:

Tags: Jobs