मुंबई, 31 ऑक्टोबर : महाराष्ट्राला प्रशासकीय अधिकाऱ्यांची फार मोठी परंपरा लाभली आहे. महाराष्ट्रातील, मराठी मातीत जन्माला आलेल्या अनेक अधिकाऱ्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर परराज्यातच नव्हे तर देशात आपल्या राज्याचे नाव मोठे केले आहे. त्यामुळे तरुण मराठी अधिकाऱ्यांच्या जीवनाचा, त्यांच्या कार्याचा, त्यांच्या अनुभवाचा मराठी तरुणाईला प्रेरणा मिळावी, या हेतूने न्यूज 18 लोकमत डिजिटल खास तरुणाईसाठी Digital Prime Time Special लाइफ @25 हा विशेष कार्यक्रम सुरू करत आहेत. आज जाणून घेऊयात, मराठी मातीत जन्माला आलेले आयपीएस अधिकारी गिरीश यादव यांच्याबाबत. गिरीश यादव यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण हे कराडमधील तांबवे या गावी मराठी माध्यमातून झाले आहे. त्यांनी त्यांनी पुण्यातून शिक्षण घेतले. पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या विषयात बीटेकची पदवी घेतली. त्यांनी यूपीएससी परिक्षा देताना तिसऱ्या प्रयत्नात आयपीएस रँक मिळवत यशाला गवसणी घातली. सध्या ते तामिळनाडू राज्यात सेवा बजावत आहेत. ते सांगतात की, यूपीएससी करताना स्पर्धा खूप आहे. कदाचित विद्यार्थ्यांना अपयशही मिळू शकते. त्यामुळे काही वेळा विद्यार्थी हा तणावात जातो. काहीवेळा तुमच्या आयुष्यात काही गोष्टी घडतात तिथून तुमचं आयुष्य बदलून जातं. त्याला तुम्ही माईलस्टोन म्हणू शकतात. ग्रामीण भागातूनही आलो तरी हार्डवर्क, मेहनत केली तर आपण पुढे जाऊ शकतो असे ते म्हणतात. प्लान बी रेडी असावा - स्पर्धा परिक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना आयपीएस अधिकारी गिरीश यादव सांगतात की, स्पर्धा परिक्षा देणाऱ्या उमेदवाराने आयुष्यात प्लान बी नेहमी रेडी ठेवला पाहिजे. म्हणजे एक गोष्ट तुम्हाला जमली नाही तर जे तुम्हाला येतं त्याकडे तुम्ही वलू शकता, आयुष्यात तो मार्ग निवडू शकता. स्पर्धा परिक्षा करताना कधीकधी व्यक्ती हा तणावात जातो. कारण काही जण पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होतात. तर काही जण तिसऱ्या, चौथ्या प्रयत्नापर्यंत जातात. अशावेळी तणाव येऊ शकतो. मात्र, अशावेळी मी ज्याठिकाणी अभ्यास करायचो त्याठिकाणी मी फैझ अहमद फैझ यांचा शेर लिहून ठेवला होता. तो असा की, दिल ना-उमीद तो नहीं नाकाम ही तो है लम्बी है ग़म की शाम मगर शाम ही तो है, त्यामुळे विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुन्हा जोमाने प्रयत्न करावेत असा सल्ला ते देतात. त्यांनी इतिहास हा त्यांचा पर्यायी विषय (optional subject) निवडला होता. शालेय जीवनापासूनच या विषयाची आवड असल्याने मी इतिहास हा पर्याय निवडला. काही ऐतिहासिक पुस्तके तसेच चित्रपटांच्या वाचनामुळे ही आवड कायम आहे, असे ते सांगतात. विद्यार्थ्यांना देतात हा सल्ला - 2016 मधील माझ्या पहिल्या प्रयत्नात मी संपूर्ण 2 महिने ऐच्छिक पूर्वतयारीसाठी दिले होते. कारण मी पहिल्यांदाच इतिहास हा विषय घेतला होता. लागोपाठच्या प्रयत्नांत या विषयाला दिलेला वेळ कमी झाला. यानंतर मी मुख्यतः प्रिलिम्स आणि मेन्सच्या दरम्यानच्या दिवसांमध्ये इतिहासाचा अभ्यास केला. हेही वाचा - Life@25 : खान्देशचे सुपूत्र IAS अधिकारी मनोज महाजन ओडिशात बजावताएत सेवा, तरुणाईला देतात ‘हा’ सल्ला मी इतिहासासाठी दैनंदिन/नियमित उत्तर लिहिण्याचा सराव केलेला नाही. पण प्रिलिम्स आणि मेन दरम्यान 2.5-3 महिन्यांच्या कालावधीत, मी आठवड्यातून एकदा विभागीय इतिहास पर्यायी चाचणी सोडवली. तसेच परीक्षेच्या 15 दिवस आधी पेपर I आणि पेपर 2 दोन्हीसाठी एकाच दिवसात पूर्ण चाचणी सोडवली. यामुळे मला माझा वेग, सादरीकरण सुधारण्यात आणि काही महत्त्वाच्या चुका आधीच टाळण्यात मदत झाली, असेही ते सांगतात. वेगळ्या नोट्सऐवजी, माझ्याकडे साइड-मार्जिन नोट्स असायची, ज्यामुळे मी जे काही वाचले आहे ते थोड्या वेळात उजळणी करण्यास मला मदत झाली. तसेच अशा नोट्स असण्याचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्ही काही सब-पॉइंट विसरल्यास लगेच क्रॉस चेकचा संदर्भ घेऊ शकता, असेही ते आपल्या विद्यार्थ्यांना सांगतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.