मुंबई, 26 डिसेंबर: आजकालच्या डिजिटलच्या (Digital Technology) युगात सोयी सुविधा वाढल्या आहेत तितकेच फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. जॉब शोधताना फसवणूक होण्याचे प्रकार होत आहेत. अशा अनेक वेबसाईट्सवर अनेक फ्रॉड (Fraud websites) आणि डेटा चोरी करणारे लोकंही असतात. जे खोटी वेबसाईट तयार करून तुमची संपूर्ण खासगी माहिती चोरी करू शकतात. तसंच तुमच्या अकाउंटमधून पैसे चोरी करू शकतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ऑनलाईन जॉब शोधताना काय काळजी (Precautions while searching jobs online) घेतली पाहिजे याबाबत सांगणार आहोत.
खासगी माहिती देऊ नका Online Job search, Precautions while searching jobs online, Digital Technology, Fraud websites, Web Page Security, career tips Marathi
ऑनलाईन जॉब शोधताना (Online Job search) तुम्हाला एखाद्या वेबसाईटवर जर ईमेल, कॉन्टॅक्ट डिटेल्स (Contact details), खाते क्रमांक (Account number), क्रेडिट-डेबिट कार्ड संबंधित माहिती यासारखी वैयक्तिक माहिती विचारली गेली असेल तर ती देऊ नका. लक्षात ठेवा नामांकित कंपन्या अशी माहिती विचारत नाहीत, कंपनी योग्य आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी त्या कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाईटला नक्की भेट द्या आणि तुम्ही बघितलेला जॉब खरंच आहे का याची खात्री करून घ्या.
महिलांनो, NDA जॉईन करायचंय? पात्रतेपासून शिक्षणापर्यंत इथे मिळेल संपूर्ण माहिती
वेब पेज सिक्युरिटी तपासा
तुम्ही ओपन केलेल्या वेबसाईटचं वेब पेज सिक्युअर (Web Page Security) आहे ना? हे आधी तपासा. हे ओळखण खूप सोपं आहे. जर वेब पेज सुरक्षित नसेल तर साइटला http ऐवजी https असं असेल. अशा प्रकारे काळजी घेतल्यानं आपली वैयक्तिक माहिती चुकीच्या हातात जाणार नाही.
प्रायव्हसी पॉलिसीकडे लक्ष द्या
सुप्रसिद्ध नामांकित कंपन्या त्यांच्या यूजर्ससाठी प्रायव्हसी पॉलिसी (Privacy Policy) ठेवतात. यात नाव, ईमेल पत्ता किंवा जास्तीत जास्त फोन नंबर आणि पत्ता विचारला जातो. बर्याच वेबसाईट्स सोशल सिक्युरिटी (Social Security) देखील देतात, प्रत्येक वेळी लॉग इन करताना त्यासाठी सिक्युरिटी कोड द्यावा लागतो. अशा साइट विश्वसनीय असतात.
Office Tips: ऑफिसमधील सहकाऱ्यांशी मतभेद आहेत? चिंता नको; असे चांगले ठेवा संबंध
नुकसान झाल्यास रिपोर्ट करा
कोणत्याही कारणास्तव जर साईटवरून आपली खासगी माहिती चोरीला गेली किंवा पैसे चोरीला गेले तर गप्प बसू नका. Internet fraud complaint center वर ऑनलाइन तक्रार दाखल करा. जर जास्त नुकसान झालं असेल तर पोलिसांच्या सायबर सेल (Cyber cell) मध्येही तक्रार नोंदविली जाऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.