Indian Railway Recruitment 2021: तब्बल 3591 जागांसाठी पदभरती; ITI झालेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

Indian Railway Recruitment 2021: तब्बल 3591 जागांसाठी पदभरती; ITI झालेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे (Indian Railway jobs 2021) ते भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 जून : भारतीय रेल्वेत (Indian railway jobs) नोकरी करण्याची चांगली संधी तरुणांना आहे. भारतीय पश्चिम रेल्वेनं (Indian Railway Recruitment 2021) अंतर्गत अप्रेंटिसच्या (Apprenticeship jobs) पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे (Indian Railway jobs 2021) ते भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात.

या जागांसाठी करू शकता अर्ज

इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, पेंटर, पाईप फिटर, प्लंबर, ड्राफ्ट्समन, फासे, वेल्डर, डिझेल मेकॅनिक, रेफ्रिजरेटर एसी मेकॅनिक, कार्पेंटर अशा पदांसाठी तब्बल 3591 जागांसाठी पदभरती होणार आहे.

हे वाचा - Job Alert: ठाणे महानगरपालिकेत 'या' पदासाठी नोकरीची संधी; त्वरित करा अप्लाय

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित फिल्डमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभवी लोकांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

खुल्या प्रवर्गासाठी परीक्षेचं रजिस्ट्रेशन शुल्क 100 रुपये असणार आहे. तर SC/ ST/PWD आणि महिलांसाठी ही परीक्षा विनाशुल्क असणार आहे.

महत्वाची तारीख

ऑनलाईन अर्ज करण्याची प्रारंभ तारीख - 25 मे 2021 सकाळी 11 वाजता

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख - 24 जून 2021 रोजी सायंकाळी 5 पर्यंत

या पदभरतीसाठी अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

भारतीय रेल्वेच्या पदभरतीबाबत अधिक जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन बघण्यासाठी इथे क्लिक करा.

Published by: Atharva Mahankal
First published: June 20, 2021, 5:20 PM IST

ताज्या बातम्या