जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / पालकांनो सावधान! तुमची मुलं तर डिप्रेशनमध्ये नाहीत ना? अशा पद्धतीनं लगेच घ्या ओळखून; वाचा सविस्तर

पालकांनो सावधान! तुमची मुलं तर डिप्रेशनमध्ये नाहीत ना? अशा पद्धतीनं लगेच घ्या ओळखून; वाचा सविस्तर

तुमचीही मुलं डिप्रेशनमध्ये नाहीत ना?

तुमचीही मुलं डिप्रेशनमध्ये नाहीत ना?

मुलं तणावात आहेत हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. चला तर मग जाणून घेऊया तुमची मुलं खरंच स्ट्रेस मध्ये आहेत का?

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 फेब्रुवारी: कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्यामुळे शाळा आणि कॉलेजेस सुरु करण्यात आले आहेत. बोर्डाच्या परीक्षाही ऑफलाईन (MH Board Offline board exams) पद्धतीनं घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ऑनलाईन शिक्षणामुळे (Online Education Problems) विद्यार्थी शिक्षणापासून आणि शाळेतील शिस्तबद्ध वातावरणापासून दूर गेले आहेत. सतत ऑनलाईन शिक्षण आणि गॅजेट्सच्या जवळ असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा सुरु झाल्यानंतर काही समस्या (Problems students facing after corona) जाणवू लागल्या आहेत. तत् परीक्षा जवळ येऊ लागल्यामुळे काही विद्यार्थी स्ट्रेसमध्ये (How to Identify students stress) आहेत. मुलं तणावात आहेत हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. चला तर मग जाणून घेऊया तुमची मुलं खरंच स्ट्रेस मध्ये आहेत का? (Is my child is in depression?) 2022 च्या बोर्ड परीक्षांबाबत बहुतांश मुलांच्या मनात भीती आहे. त्यांना सुरुवातीपासूनच अशा प्रकारे कंडिशन केले जाते की बोर्डाच्या परीक्षेच्या नावानेही ते अस्वस्थ होऊ लागतात. 10वी-12वीची परीक्षा खडतर असली तरी इतकी नाही. याचा मुलांच्या मनावर परिणाम होऊ लागतो. लगेच ओळख तुमच्या मुलांच्या वागण्यातील फरक. महत्त्वाची बातमी! बारावी परीक्षेच्या टाइम टेबलमध्ये बदल; हे 2 पेपर्स ढकलले पुढे मुलांमधील तणाव ओळखा बरेच पालक हे स्वीकारत नाहीत की त्यांचे मूल चिंतेचा (Anxiety Symptoms) बळी आहे. तुमच्या मुलाचे वर्तन बदलत असल्याचे तुमच्या लक्षात आल्यास, त्याच्याकडे जास्त लक्ष देणे सुरू करा. पण हे त्यांना कळू देऊ नका. त्यांच्या वागण्या बोलण्याकडे लक्ष ठेवा. मुलं नीट झोपताहेत ना? जर तुमची मुले रात्री नीट झोपत नसेल किंवा त्यांच्या झोपेचे वेळापत्रक इतर कोणत्याही प्रकारे विस्कळीत होत असेल तर ते चिंतेचे लक्षण आहे. ते नीट झोपत नसतील किंवा ,ढेच मध्यरात्री उठून बसत असतील तर त्यांच्याकडे लक्ष द्या. त्यांच्या खाण्या-पिण्याकडे द्या लक्ष चिंतेचे आणखी एक लक्षण म्हणजे भूक न लागणे. तुमच्या मुलाच्या खाण्याच्या वेळापत्रकात काही बदल दिसल्यास, त्याकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. लहान वयामध्ये मुलांना अधिक भूक लागते आणि त्यांना आवडीचे पदार्थ खायला आवडतात. मात्र सध्याच्या काळात तुमची मुलं नीट खात-पीत नसतील तर हे गंभीर लक्षण असू शकतं. Coding Learning: आतापासूनच तुमच्या मुलांना शिकवा कोडिंग; भविष्यात होतील हे फायदे ताण अशाप्रकारे करा दूर मुलांचा ताण कमी करण्यासाठी त्यांना रोज व्यायाम, योगासने, खेळण्याचा सल्ला द्या. मुलांच्या परीक्षेचा काळ चालू असला तरी त्यांना अर्धा ते एक तास खेळायला किंवा विश्रांती द्या. यामुळे मुलांमध्ये सकारात्मक ऊर्जा येते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात