जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / DRDO मध्ये नोकरी मिळाली तर तुमची लाईफ सेट; तब्बल 56,000 पासून होते पगाराची सुरुवात; ही पात्रता असणं IMP

DRDO मध्ये नोकरी मिळाली तर तुमची लाईफ सेट; तब्बल 56,000 पासून होते पगाराची सुरुवात; ही पात्रता असणं IMP

तब्बल 56,000 पासून होते पगाराची सुरुवात

तब्बल 56,000 पासून होते पगाराची सुरुवात

आज आम्ही तुम्हाला DRDO मध्ये जॉब नक्की कसा मिळवावा (How to get job in DRDO) आणि यासाठी काय पात्रता (Eligibility for DRDO jobs) असणं आवश्यक आहे? हे सांगणार आहोत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 09 सप्टेंबर: आजकालच्या काळात लाखो विद्यार्थी सरकारी परीक्षांसाठी मेहनत करत असतात. आपल्या गावरानमेन्ट जॉब मिळेल आणि लाईफ सेट होईल असा विचार तरुणांमध्ये असतो. त्यात देशाच्या डिफेन्स रिसर्च विंगमध्ये नोकरी म्हणजे सोन्याहून पिवळं. DRDO म्हणजे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत नोकरी मिळाली तर चांगलंच. पण DRDO मध्ये नोकरी घेणं इतकं सोपं नाही. इथे नोकरी मिळवण्यासाठी प्रचंड मेहनतीची गरज असते. पण इथे जॉब मिळवायचा तरी कसा? आज आम्ही तुम्हाला DRDO मध्ये जॉब नक्की कसा मिळवावा (How to get job in DRDO) आणि यासाठी काय पात्रता (Eligibility for DRDO jobs) असणं आवश्यक आहे? हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. 12वी नंतर सायन्समध्ये ग्रॅज्युएशन करायचंय? मग ‘या’ हटके क्षेत्रांबद्दल ऐकलंत का? DRDO मध्ये सामील होण्यासाठी शैक्षणिक पात्रता DRDO मधील वेगवेगळ्या पदांसाठी अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती भिन्न आहेत. अशा परिस्थितीत वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रता आवश्यक आहेत. डीआरडीओमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना प्रथम अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, संगणक विज्ञान आणि संबंधित विषयांमध्ये पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे. इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी देखील तंत्रज्ञ सारख्या पदांसाठी पात्र आहेत. DRDO मध्ये शास्त्रज्ञ होण्यासाठी काय करावं? DRDO मध्ये शास्त्रज्ञ होण्यासाठी, प्रथम कोणत्याही विज्ञान अभ्यासक्रमात पदवी पूर्ण करा. यानंतर पदव्युत्तर अभियांत्रिकी अभ्यासक्रम ६५ टक्के गुणांसह उत्तीर्ण व्हा. यानंतर, तुम्हाला DRDO सायंटिस्ट एंट्री टेस्ट क्रॅक करावी लागेल. संस्थेत प्रवेश घेण्यासाठी ही एक प्रवेश परीक्षा आहे. तथापि, अभियांत्रिकीमधील पदवीधर अभियोग्यता चाचणीच्या आधारे देखील भरती केली जाते. आयुष्यभर 10-15 हजारांची नोकरी करायची इच्छा नाहीये ना? मग आताच करा ‘हे’ कोर्सस

 ग्रेडनुसार मिळतो पगार

वैज्ञानिक B: 56,100/महिना वैज्ञानिक C: 67,700/महिना वैज्ञानिक डी: 78,800/महिना वैज्ञानिक ई: 1,23,100/महिना वैज्ञानिक एफ: 1,31,100/महिना वैज्ञानिक जी: 1,44,200/महिना वैज्ञानिक एच: 1,82,200/महिना प्रतिष्ठित शास्त्रज्ञ: 2,05,400/महिना सचिव, संरक्षण संशोधन आणि विकास विभाग आणि अध्यक्ष, DRDO: रु 2,25,000/महिना

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात