मराठी बातम्या /बातम्या /करिअर /12वी नंतर सायन्समध्ये ग्रॅज्युएशन करायचंय ना? मग 'या' हटके क्षेत्रांबद्दल ऐकलंत का? थेट परदेशात मिळेल नोकरी

12वी नंतर सायन्समध्ये ग्रॅज्युएशन करायचंय ना? मग 'या' हटके क्षेत्रांबद्दल ऐकलंत का? थेट परदेशात मिळेल नोकरी

देशात 'या' क्षेत्राला वाढतेय मागणी

देशात 'या' क्षेत्राला वाढतेय मागणी

तुम्ही बारावीनंतर करिअर (Career after 12th) करू शकता. तसंच सायन्स स्ट्रीममधील काही हटके कोर्सेस बद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 07 सप्टेंबर: आजकाल अनेक विद्यार्थ्यांना लगेच पैसे कमवण्याची इच्छा असते. यासाठी त्यांना अधिक वेळ वाटही बघायची नसते. दहावी किंवा बारावी झाल्यानंतर त्यांना लगेच जॉब (Jobs after 10th and 12th) हवा असतो. घरची आर्थिक परिस्थिती यामागची एक प्रमुख कारण असू शकतं. बारावीनंतर हे शक्य आहे. आता तुम्ही बारावी उत्तीर्ण केल्यांनतर नक्की कोणत्या क्षेत्रात career करायचं या प्रश्नाला घेऊन चिंतीत असाल तर ता चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला अशा काही क्षेत्रांबद्दल (Best sectors or jobs after 12th) माहिती देणार आहोत ज्यामध्ये तुम्ही बारावीनंतर करिअर (Career after 12th) करू शकता. तसंच सायन्स स्ट्रीममधील काही हटके कोर्सेस बद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

मायक्रोबायोलॉजी

मायक्रोबायोलॉजी कोर्स हा देखील करिअरसाठी चांगला पर्याय आहे. या अभ्यासक्रमात प्रवेश कोणत्याही महाविद्यालयात नंबरच्या आधारे तर कुठे प्रवेश परीक्षेद्वारे होतो. या विषयाचा अभ्यास केल्यानंतर, विद्यार्थी सरकारी नोकऱ्या मिळवण्याव्यतिरिक्त फार्मा, संशोधन, अन्न उत्पादने आणि कृषी यासारख्या विस्तृत क्षेत्रात अनेक प्रकारच्या नोकऱ्या करू शकतात.

12वी पास असाल तर नोकरीची ही सुवर्णसंधी सोडूच नका; इथे 14,000 रुपये पगारचा जॉब

स्पेस सायन्स

हे खूप वेगाने वाढणारे क्षेत्र आहे, त्यात तारकीय विज्ञान, ग्रह विज्ञान, कॉस्मॉलॉजी, खगोल यांसारख्या अनेक क्षेत्रांचा समावेश आहे. या क्षेत्रात तीन वर्षे बीएस्सी आणि चार वर्षे बीटेक ते पीएचडी करण्याचा पर्याय आहे. हे अभ्यासक्रम सध्या बेंगळुरूमधील ISRO आणि IISc येथे केवळ चालवले जातात.

अॅस्ट्रो फिजिक्स

जर तुमचा ग्रह आणि तारे यांचा प्लॅन असेल तर तुम्ही १२वी नंतर अॅस्ट्रो फिजिक्स कोर्स करू शकता. यामध्ये विद्यार्थ्यांना पाच वर्षांचा संशोधनाभिमुख कार्यक्रम आणि भौतिकशास्त्रातील बीएस्सी तीन वर्षांचा बॅचलर प्रोग्रामचा पर्याय आहे. अॅस्ट्रो फिजिक्समध्ये डॉक्टरेट केल्यानंतर विद्यार्थी इस्रोसारख्या संशोधन संस्थेत शास्त्रज्ञ बनू शकतात.

Job Alert: SBIमध्ये 5000हून अधिक जागांसाठी भरती; कुठे कराल अर्ज?

डेअरी सायन्स

विज्ञान विषयांसह 12वी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी 4 वर्षांच्या अंडरग्रेजुएट डेअरी टेक्नॉलॉजी कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकतात. या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा दरवर्षी अखिल भारतीय स्तरावर घेतली जाते. याशिवाय अशा अनेक खासगी संस्था आहेत ज्या डेअरी तंत्रज्ञानाचा 2 वर्षांचा डिप्लोमा कोर्स देतात.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert