मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Career Tips: फॅशन डिझायनर होऊन तुमचं स्वप्न करा पूर्ण; जाणून घ्या कोर्सेसपासून पात्रतेपर्यंत संपूर्ण माहिती

Career Tips: फॅशन डिझायनर होऊन तुमचं स्वप्न करा पूर्ण; जाणून घ्या कोर्सेसपासून पात्रतेपर्यंत संपूर्ण माहिती

करिअर करण्याच्या संधी जाणून घ्या.

करिअर करण्याच्या संधी जाणून घ्या.

आज आम्ही तुम्हाला फॅशन डिझायनर कसं होणार (Fashion Designer course) आणि यासाठी कोणते कोर्सेस करायचे? याबद्दल माहिती देणार आहोत.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 07 डिसेंबर: मोठमोठ्या सेलिब्रिटी अनेक प्रकारचे फॅशनेबल कपडे (Fashionable cloths) घालतात हे आपण बघितलंच होतं. मात्र आता लहान मोठ्या कार्यक्रमांसाठी सामान्य लोकंसुद्धा डिझायनर कपडे (Designer Cloths) घालायला लागले आहेत. त्यामुळे फॅशन डिझाईनबद्दलची क्रेझ (Fashion Design) तरुणाईमध्ये प्रचंड वाढत चालली आहे. अनेक तरुण-तरुणीचं फॅशन डिझायनर (How to become fashion Designer) होण्याचं स्वप्न असतं. आता हे तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. आज आम्ही तुम्हाला फॅशन डिझायनर कसं होणार (Fashion Designer course) आणि यासाठी कोणते कोर्सेस करायचे? याबद्दल माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

जर तुम्ही क्रिएटिव्ह असाल, तुम्हाला नवीन रंग, डिझाईन्स आणि स्टाइल्सचे आकर्षण असेल, तर फॅशन डिझायनिंग हा करिअरचा (Career in Fashion Design) उत्तम पर्याय सिद्ध होऊ शकतो. फॅशन डिझायनिंगला भारतात तसेच परदेशातही विस्तृत वाव आहे. त्यात करिअर करण्याच्या संधी जाणून घ्या.

फॅशन डिझायनिंग म्हणजे नक्की काय?

वेगवेगळ्या डिझाइन्स आणि वेगवेगळ्या रंगांचे ड्रेस, ज्वेलरी बाजारात पाहायला मिळतात. याला फॅशन म्हणतात. फॅशन डिझायनिंगमध्ये, विविध प्रकारचे फॅब्रिक्स, रंग आणि ट्रेंड वापरून नवीन शैली तयार केल्या जातात. फॅशन डिझायनिंग ही कला केवळ कपड्यांपुरती मर्यादित नाही, तर त्यात हँडबॅग, पादत्राणे, दागिने इत्यादींचाही समावेश असतो.

क्या बात है! आता थेट परदेशात जाऊन शिकवा English; करावा लागेल हा कोर्स; वाचा

अंगी हे गुण असणं आवश्यक

सर्जनशील आणि आर्टिस्टिक थिंकिंग

उत्कृष्ट रेखाचित्र कौशल्ये

देश आणि परदेशातील नवीनतम फॅशन ट्रेंडमध्ये आवड

चांगल्या प्रतिभेसह उत्कृष्ट व्हिज्युअलायझेशन स्किल्स.

टेक्श्चर, फॅब्रिक्स, रंग इत्यादींची चांगली समज.

स्पर्धात्मक गुण

चांगलं कम्युनिकेशन स्किल्स.

ही पात्रता असणं आवश्यक

फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर करण्यासाठी फॅशन डिझाईन/फॅशन टेक्नॉलॉजी/टेक्सटाईल डिझाईन किंवा संबंधित क्षेत्रात डिप्लोमा किंवा पदवी (फॅशन डिझायनिंग कोर्स) असणे आवश्यक आहे. 12वी नंतर फॅशन डिझायनर होण्यासाठी तुम्हाला भारतातील पदवीपूर्व अभ्यासक्रमांमध्ये NID परीक्षा/UCEED/CEED/NIFT प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. तुम्ही फॅशन डिझाईनमध्ये डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्सही करू शकता. तर पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा तत्सम इतर कोणतीही पात्रता असणे आवश्यक आहे.

इथे मिळू शकतो जॉब

फॅशन डिझाईनचा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला स्वतःचं बुटीक सुरु करण्याची इच्छा असेल तर तुम्ही हा व्यवसाय करु शकता. तसंच तुम्ही एखाद्या फॅशन फर्ममध्ये जॉब करू शकता. तुम्हाला इथे कामानुसार पगार मिळू शकतो.

First published:

Tags: Career, Fashion, जॉब